चाकणमध्ये मित्रांची ‘रक्ताळलेली’ मैत्री: बिअरच्या बाटलीने एकमेकांवर(PCMC Crime) वार
चाकण येथील बालाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका खळबळजनक घटनेत दोन मित्रांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला. नागेश चिम (वय २४) आणि सचिन आरेकर (वय २३) हे दोघे मित्र दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. नागेशने सचिनला “जास्त दारू पिऊ नको आणि गाडी चालवू नको” असे सुनावले. याचा राग आल्याने सचिनने बिअरची बाटली नागेशच्या डोक्यात फोडली.
दुसरीकडे, सचिन आरेकर यानेही नागेशविरुद्ध तक्रार दिली असून, नागेशने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने बाटलीने वार केल्याचा आरोप केला आहे. या झटापटीत सचिनच्या हाताची शिर कापली गेली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलिसांनी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल केले असून तपास सुरू (PCMC Crime)आहे.
चिंचवडमध्ये १२ लाखांची स्कार्पिओ हडपली; बनावट कागदपत्रांद्वारे विक्री
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात फसवणुकीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अविनाश बोराडे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी कपीकेश महापुरे यांची १२ लाख रुपये किमतीची स्कार्पिओ गाडी (MH XB 0069) लग्नासाठी नेली. मात्र, फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी गाडीचे बनावट आरसी बुक, आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे गाडीची परस्पर विक्री करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भालचंद्र थोरात याला पोलिसांनी अटक केली असून अन्य तीन आरोपींचा शोध सुरू (PCMC Crime) आहे.
हिंजवडीत ६६ लाखांचा ‘इम्पोर्ट-एक्सपोर्ट’ गंडा
व्यवसायाचे अमिष दाखवून एका शेतकऱ्याची ६६ लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना हिंजवडीत घडली. मारुती सावंत या फिर्यादीला आरोपी गणेश बारणे, ज्ञानेश शिंदे आणि भरत बानखेले यांनी रिअल इस्टेट व इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायातून मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवले. आरोपींनी सावंत यांच्या प्लॉटवर कर्ज काढून आणि रोख स्वरूपात असे एकूण ६६ लाख रुपये घेतले. मात्र, कोणताही व्यवसाय न करता ही रक्कम हडपली. पैसे परत मागितले असता सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (PCMC Crime) आली.
अडीच लाखांचा कॅमेरा भाड्याने घेऊन पोबारा
हिंजवडीतील फेज ३ परिसरातून महागडा कॅमेरा भाड्याने घेऊन तो परत न करता फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अंकित राणे याने ओमकार जंगम यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि इतर साहित्य भाड्याने घेतले होते. मुदत संपूनही साहित्य परत न करता ते स्वतःसाठी वापरल्याचे उघड होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला (PCMC Crime)आहे.
तडीपार गुंडाची कोयत्यासह दहशत; बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बावधन येथील कोकाटे वस्ती परिसरात तडीपार गुंड शंकर तोडकर हा हातात कोयता घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण करत होता. दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही तो विनापरवाना शहरात आला होता. बावधन पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असून, त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले (PCMC Crime)आहे.
शिरगावमध्ये गावठी हातभट्टीवर छापा; १.६१ लाखांचा माल जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने शिरगाव हद्दीतील गोडंब्रे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टीवर धाड टाकली. यावेळी आकाश लोडे आणि संदीप राठोड हे दोघे गुळमिश्रित रसायन भिजत घालून दारू तयार करताना रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली (PCMC Crime)आहे.
पोलीस कारवाईचा आढावा:
या सर्व प्रकरणांत पोलीस उपनिरीक्षक कोरडे, भाबड, बळीप आणि कांदे अधिक तपास करत आहेत. शहर शांत ठेवण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले (PCMC Crime)आहे.
