ग्रंथोत्सव २०२५चे उद्घाटन उत्साहात
पिंपरी (१५ मार्च २०२६) : “लेखणीत जग आणि जीवन बदलण्याची ताकद असते. जगातील अनेक क्रांती लेखणीच्या बळावर घडल्या आहेत,” असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी केले. पिंपरी कॉलनी येथील आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२५च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत (Arya Samaj Library) होते.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले (Arya Samaj Library)आहे.
या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ (पुणे) प्रमुख कार्यवाह सोपान पवार, शासकीय विभागीय ग्रंथालय पुणेचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन शिंदे, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजेंद्र ढमाले, कोषाध्यक्ष रमेश सुतार, आर्य समाजचे प्रधान सुरेंद्र करमचंदानी आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Arya Samaj Library)होते.
यावेळी श्रीकांत चौगुले यांनी विद्यार्थ्यांवर मराठी साहित्याचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सोपान पवार यांनी सध्या ग्रंथालयांची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी शासनाच्या सहकार्याने ती सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त केला. सुरेश रिद्दीवाडे यांनी वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना समान महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले. रमेश सुतार यांनी संतपरंपरेमुळे मायमराठी टिकून राहिल्याचे मत व्यक्त (Arya Samaj Library) केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात (Arya Samaj Library) आली.
यानंतर महाराष्ट्रगीत, आर्य समाज विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत, जयहिंद विद्यालयातील बालशाहीर तनिष्क मगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, तसेच ह.भ.प. दादा मोरे, ह.भ.प. संगीता भालेराव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले “ग्रंथ हाती, ग्रंथ आमुचे साथी” हे ग्रंथगीत यामुळे उद्घाटन सत्राला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद (Arya Samaj Library)दिली.
पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी प्रास्ताविक करताना ग्रंथोत्सवाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथपाल हा वाचन चळवळीचा दीपस्तंभ असून वाचक हा त्या चळवळीचा प्राण आहे, असे त्यांनी नमूद (Arya Samaj Library)केले.
यावेळी ‘मातृरक्षा’ मासिक आणि ‘स्पर्धा वार्ता’ या साप्ताहिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ ग्रंथप्रेमी धोंडिबा सुतार यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्रापूर्वी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे अनावरण करण्यात (Arya Samaj Library) आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दीक्षित यांनी केले, तर श्रीकांत सांगेपाग यांनी आभार प्रदर्शन (Arya Samaj Library)केले.
