(विवेक कुलकर्णी ):१९९७ साली पोटापाण्याच्या शोधात मी पुण्यात आलो. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी आलेल्या माझ्यासारख्या असंख्य जणांना जसा या शहराने आधार दिला, तसाच आधार मला पुण्याच्या निगडी या उपनगराने दिला. काळाच्या ओघात संसार स्थिरावला, व्यवसाय उभा राहिला आणि स्वप्नात पाहिलेलं आयुष्य हळूहळू प्रत्यक्षात उतरू लागलं. आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मनातली दुसरी आवड पुन्हा डोकावू लागली आणि २००७ मध्ये माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मी मुक्त पत्रकारितेत पाऊल (Versetile Pushkraj Chirputkar) टाकले.
त्या काळात लोकसत्ताचे ज्येष्ठ वार्ताहर विवेक इनामदार यांची भेट झाली. ही भेट माझ्यासाठी आयुष्याला दिशा देणारी ठरली. त्यांनी केवळ पत्रकारितेचे धडे दिले नाहीत, तर मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला. स्वतःचा व्यवसाय सांभाळत मुक्त पत्रकार म्हणून काम कर, हा त्यांचा सल्ला आजही माझ्यासाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांनी मला कधीच चौकटीत अडकवले नाही; उलट मुक्तपणे काम करण्याची संधी दिली. त्या विश्वासातूनच माझी अनेक मान्यवरांशी ओळख (Versetile Pushkraj Chirputkar) झाली.
याच काळात अथर्व थिएटरचे डॉ. संजीवकुमार पाटील यांच्याशी परिचय झाला आणि तो पुढे जिव्हाळ्याच्या मैत्रीत बदलला. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाच्या तालमी सुरू होत्या. त्यासाठी संजूभैय्याचा मित्र म्हणून मी तालमी पाहायला जात असे. यातूनच माझा अथर्व थिएटर सोबत ऋणानुबंध जुळला. अशाच एका तालमींमध्ये प्रथमच एका शांत, साध्यासुध्या दिसणाऱ्या, पण डोळ्यांत वेगळीच चमक असलेल्या तरुणाकडे माझे लक्ष गेले. तो होता पुष्कराज(Versetile Pushkraj Chirputkar) चिरपुटकर.
पहिल्या नजरेत तो इतर कलाकारांसारखाच वाटला; पण काही दिवसांतच त्याच्या अभिनयातील सहजता, निरीक्षणशक्ती आणि संवादफेकीतील नैसर्गिकपणा लक्ष वेधून घेऊ लागला. अथर्व थिएटरमध्ये तो हळूहळू ‘हुकमी एक्का’ बनत गेला. त्या काळातच मनात एक भावना निर्माण झाली होती—हा मुलगा फार दूर जाणार (Versetile Pushkraj Chirputkar) आहे.

पुष्कराजचा प्रवास सहज नव्हता. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले, चांगल्या पगाराची नोकरी, निगडीसारख्या विकसित परिसरात स्थिर संसार… बाहेरून पाहता कोणालाही हेच आयुष्य सुरक्षित वाटले असते. पण प्रत्येक यशस्वी कलाकाराच्या मनात एक अस्वस्थ स्वप्न असते. त्यालाही अभिनयाने स्वस्थ बसू दिले नाही. सुरक्षित नोकरीचा मोह बाजूला ठेवून त्याने मुंबईची वाट धरली. तिथे त्याने संघर्ष केला, ऑडिशन्स दिल्या, नकार पचवले, प्रतीक्षा केली आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध(Versetile Pushkraj Chirputkar) केले.
कष्टाचे फळ मिळाले ते ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे. ‘आशू’च्या भूमिकेने त्याला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही. दूरचित्रवाणी, चित्रपट, सूत्रसंचालन, रंगभूमी अशा प्रत्येक माध्यमात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मी वसंतराव चित्रपटातील पी. एल. देशपांडे यांच्या भूमिकेसाठी मिळालेला झी चित्र गौरव पुरस्कार असो, हिंदी चित्रपट चंदू चॅम्पियनमधील भूमिका असो किंवा लाईक आणि सबस्क्राईब करा, तू बोल ना, अशी ही जमवा जमवी, अशा विविध चित्रपटांतील त्याचे काम असो—प्रत्येक भूमिकेत त्याने स्वतःची छाप उमटवली (Versetile Pushkraj Chirputkar) आहे.
आज निगडी येथे समर्थ चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्यात त्याची पुन्हा भेट झाली. सभागृहात लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याचे स्वागत होत होते; पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र अथर्व थिएटरमधील तो साधा, शांत, अभ्यासू आणि स्वप्नांनी भारलेला तरुण उभा होता. काळ बदलला, प्रसिद्धी वाढली, चाहत्यांची संख्या वाढली; पण त्याच्या वागण्यातला साधेपणा आणि आपलेपणा मात्र तसूभरही बदललेला दिसला (Versetile Pushkraj Chirputkar) नाही.
कलाकारांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी जाणवते—लोकप्रियता आणि प्रतिभा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकांना लोकप्रियता लवकर मिळते, पण प्रतिभेला न्याय देणारी भूमिका मात्र उशिरा मिळते. पुष्कराजबाबतही मला हेच वाटते. त्याच्या अंगी असलेली अभिनयाची ताकद, भूमिकेचा अभ्यास, भावविश्वातील बारकावे पकडण्याची क्षमता आणि पडद्यावर सहजपणे जगण्याची कला पाहता, त्याच्या प्रतिभेला साजेशी सर्वार्थाने मोठी भूमिका अजून मिळायची आहे. ज्या दिवशी अशी भूमिका त्याच्या वाट्याला येईल, त्या दिवशी तो अभिनयाचा असा आविष्कार घडवेल की प्रेक्षक थक्क होतील, याची मला खात्री (Versetile Pushkraj Chirputkar) आहे.

नशिबाची साथ, योग्य संधी आणि अथक परिश्रम या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्टारडम जन्माला येते. संघर्ष अनेकजण करतात, पण त्या संघर्षाला सातत्य, संयम आणि स्वतःवरचा विश्वास जोडला गेला तरच यश टिकते. पुष्कराजच्या प्रवासात हे तिन्ही गुण ठळकपणे (Versetile Pushkraj Chirputkar) दिसतात.
पिंपरी-चिंचवडच्या मातीत वाढलेला हा गुणी कलाकार आज मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्याचा आजवरचा प्रवास अभिमानास्पद आहे; पण मला अजूनही वाटते, त्याचा सर्वोत्तम अभिनय प्रेक्षकांनी पाहायचा बाकी (Versetile Pushkraj Chirputkar) आहे.
काही कलाकार यशस्वी असतात, काही लोकप्रिय असतात; पण फार थोडे कलाकार असे असतात, ज्यांच्याबद्दल आपण निःसंकोचपणे म्हणू शकतो—”याचा सर्वोत्तम अजून यायचा आहे!” पुष्कराज चिरपुटकर हा त्यापैकीच एक. पिंपरी-चिंचवडचा हा सुपुत्र येणाऱ्या काळात आपल्या अभिनयाने अधिक मोठी उंची गाठेल आणि आपल्या शहराच्या नावात मानाचा आणखी एक तुरा खोवेल, असा विश्वास नव्हे तर ठाम खात्रीच (Versetile Pushkraj Chirputkar) वाटते.
