प्रतिनिधी:वाकड, पुणे येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर्स आणि आयपीओमधून मोठा नफा झाल्याचा भास निर्माण करून जवळपास ६० लाखांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. नफा काढण्यासाठी १५ टक्के टॅक्स भरावा लागेल, असे सांगत आरोपींनी त्यांच्याकडून रक्कम उकळली. या प्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Online Investment Scam )केली आहे.
आरोपींमध्ये ‘NIFTY ग्रुप’चा अॅडमिन, Olivia नावाची व्हॉट्सअॅप नंबर धारक महिला आणि Vikas Pershad तसेच इतर काही बँक खातेधारकांचा समावेश आहे. नफ्याच्या नावाखाली रकमांची मागणी करत पीडितेकडून एकूण ५९ लाख ६५ हजार रुपये घेतले गेले. पैसे भरल्यानंतरही नफा किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणताही पुरावा न देता त्याची आर्थिक फसवणूक करण्यात (Online Investment Scam ) आली.
