पिंपरी-चिंचवड : मुळा नदीवरील सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाच्या कामात आणि त्याच्या सुशोभीकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली (Sangvi Bopodi Bridge) आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, या पुलासाठी सन २०२२ मध्ये सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कामादरम्यान वारंवार मुदतवाढ व खर्चवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर पुलाच्या सुशोभीकरणासाठीही तब्बल २१ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात(Sangvi Bopodi Bridge) आले.
दरम्यान, पुलाचे उद्घाटन २०२४ मध्ये करण्यात आले होते, तर सुशोभीकरणाचे उद्घाटन ७ एप्रिल २०२६ रोजी पार पडले. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना आणि ठेकेदारांची बिले प्रलंबित असताना अशा कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले(Sangvi Bopodi Bridge) आहे.
भापकर यांनी या प्रकरणात निविदा प्रक्रिया, मंजूर दर, अटी-शर्ती, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी, मोजमाप पुस्तिका तसेच बिले यांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच सुशोभीकरणासाठी वापरलेल्या साहित्याचा दर्जा व बाजारभाव तपासण्याचीही मागणी करण्यात आली (Sangvi Bopodi Bridge)आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तज्ञ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व झालेल्या आर्थिक अपहाराची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली(Sangvi Bopodi Bridge) आहे.

