प्रतिनिधी :सुप्रसिद्ध अभिनेत्री व मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी उत्साहपूर्ण वातावरण,पिंपरी चिंचवड महापालिकेचा विशेष उपक्रम – प्रभातफेरी, फ्लॅश मॉब व पथनाट्याद्वारे (Lokshahi Jagar) मतदान जनजागृती
‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ या जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला… लोकशाहीच्या जागृतीसाठी शेकडो नागरिकांची प्रभातफेरी निघाली… आणि संपूर्ण वातावरणात उत्साहाची लाट उसळली. निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी आज सकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ कार्यक्रमात लोकशाहीचा जागर अनुभवायला(Lokshahi Jagar )मिळाला.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत सातत्याने विविध मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुर्गादेवी टेकडी परिसरात ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती (Lokshahi Jagar ) लाभली.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले(Lokshahi Jagar ) होते.
निगडी येथील दुर्गादेवी टेकडी परिसरातील मुख्य रस्त्यापासून ते पायथ्यापर्यंत अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते मतदान जनजागृती पत्रकांचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले. यानंतर प्रभातफेरीला सुरुवात झाली. फेरीदरम्यान ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ तसेच ‘मतदान करा, मतदान करा – १५ जानेवारीला मतदान करा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून(Lokshahi Jagar ) गेला.
या कार्यक्रमात मतदान जनजागृतीसाठी सादर करण्यात आलेल्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तसेच प्रभावी संदेश देणाऱ्या पथनाट्याच्या सादरीकरणातून मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका व जबाबदारी प्रभावीपणे अधोरेखित करण्यात(Lokshahi Jagar ) आली.
यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या, “पिंपरी चिंचवड महापालिकेने मतदान जनजागृतीसाठी सातत्याने राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. मतदान हा केवळ हक्क नसून ते आपले कर्तव्य आहे. आपल्या पुढील पिढीसाठी येत्या १५ जानेवारीला प्रत्येकाने आवर्जून मतदान करावे. युवकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन स्वतः मतदान करावे व इतरांनाही यासाठी प्रेरित करावे. मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस न समजता प्रत्येक पात्र मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे,” असे आवाहन त्यांनी(Lokshahi Jagar ) केले.
उपायुक्त अण्णा बोदडे यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “२०१७ मधील पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढवायची आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी (Lokshahi Jagar )पुढाकार घ्यावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
मतदानाची घेतली शपथ
यावेळी उपस्थित नागरिकांनी,
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करू,” अशी शपथ घेतली. यासोबतच १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त(Lokshahi Jagar ) केला.
सेल्फीचा उत्साह… मतदानाचाही निर्धार!
‘वॉकेथॉन फॉर मतदान’ कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. नागरिकांचा हा उत्साह पाहून श्रेया बुगडे यांनी संवाद साधत महत्त्वाचे आवाहन (Lokshahi Jagar )केले.
त्या म्हणाल्या, “माझ्यासोबत जसा तुम्ही उत्साहाने सेल्फी काढता, तसाच उत्साह मतदानासाठीही दाखवा. मतदान करूनच आपण लोकशाही अधिक बळकट करू(Lokshahi Jagar ) शकतो.”
त्यांच्या या संदेशामुळे सेल्फीच्या माध्यमातूनही मतदान जनजागृती प्रभावीपणे साध्य झाल्याचे चित्र या कार्यक्रमात पाहायला(Lokshahi Jagar ) मिळाले.
