मुंबई : महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून काही ठिकाणी पारा ४५ अंशांवर पोहोचला (Maharashtra Heat Wave Alert)आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे २२ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला(Maharashtra Heat Wave Alert) आहे.
शनिवारी अकोला आणि अमरावती येथे ४५.६ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ४५.५ अंश, नंदुरबार ४४.७ अंश, चंद्रपूर व नागपूर ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये ४२ अंश, पुण्यात ४०.९ अंश तर सातारा आणि सांगलीत ४०.२ अंश तापमान नोंदवले (Maharashtra Heat Wave Alert) गेले.
दरम्यान, कोकण-गोवा विभागात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (Maharashtra Heat Wave Alert)आहे.
राज्यात सोमवारपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २८ एप्रिलपासून विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली (Maharashtra Heat Wave Alert)आहे.
