प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र दरम्यान दि. २८ फेब्रुवारी (शनिवार) व रविवार सुट्टीचे दिवस आल्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळत असल्याची तक्रार पुढे येत (PCMC Nominated Corporater)आहे.
या पदासाठी विविध शासकीय कागदपत्रे व ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) सादर करणे बंधनकारक असल्याने ती मिळवण्यासाठी अधिक वेळ लागतो. अल्प मुदतीमुळे कागदपत्रांची पूर्तता करताना मोठी धावपळ करावी लागत असून अनेक इच्छुकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात (PCMC Nominated Corporater)आहे.
सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी आणि पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत (PCMC Nominated Corporater)आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली(PCMC Nominated Corporater) आहे.
भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनीही यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन देत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. इच्छुक उमेदवारांना आवश्यक NOC व इतर कागदपत्रे गोळा करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी त्यांची भूमिका आहे.मागण्या मान्य न झाल्यास मनपा कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी (PCMC Nominated Corporater)दिला आहे.
