प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. ना. श्री. अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा सायंकाळी ठीक ४.०० वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडणार (Condolence Meeting)आहे.
या शोकसभेस शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी-माजी आमदार व खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका, सामाजिक संस्था (एन.जी.ओ.) प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार (Condolence Meeting)आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.
