पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ येथे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि. १४ मे) आणि शुक्रवार (दि. १५ मे २०२६) या दोन दिवसांत होणाऱ्या या विशेष सोहळ्यात आकर्षक लाईट शो, विद्युत रोषणाई तसेच शिवकालीन वैभवाचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले (Statue Of Hindubhushan)आहेत.
सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विशेष लाईट शो सादर करण्यात येणार असून, धर्मवीर शंभूराजेंच्या शौर्यगाथा, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आधुनिक प्रकाशयोजना, ध्वनी आणि दृश्य माध्यमांच्या सहाय्याने उलगडण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर भगव्या प्रकाशाने उजळून निघणार असून, हा सोहळा शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी (Statue Of Hindubhushan) सांगितले.
“धर्मवीर शंभूराजेंना अनोखी मानवंदना” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असल्याचा दावा हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मरक्षणासाठीचे बलिदान, हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठीचा संघर्ष आणि त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट (Statue Of Hindubhushan)केले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील हजारो शिवप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून धर्मवीर शंभूराजेंच्या तेजस्वी इतिहासाला अभिवादन करावे, असे आवाहन हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे करण्यात आले (Statue Of Hindubhushan) आहे.
दुग्धाभिषेक व शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
गुरुवार (दि. १४ मे) रोजी सकाळी ८ वाजता धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक व विधिवत पूजाअर्चा करण्यात येणार आहे. मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनी हा सोहळा पार पडणार असून, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार (Statue Of Hindubhushan) आहेत.
तसेच सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तलवारी, ढाली, भाले, कट्यारी, तोफा आणि शिवकालीन युद्धसामग्रीचे विविध प्रकार नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. शिवकालीन युद्धकला, शस्त्रांचे महत्त्व आणि मराठा साम्राज्याच्या लढाऊ परंपरेची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. इतिहास अभ्यासक, शिवव्याख्याते आणि तरुण पिढीसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार(Statue Of Hindubhushan) आहे.
प्रतिक्रिया
“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणासाठीचे बलिदान संपूर्ण हिंदुस्थानासाठी प्रेरणादायी आहे. नव्या पिढीला शंभूराजेंचा तेजस्वी इतिहास समजावा आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ येथे भव्य लाईट शो, विद्युत रोषणाई आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर शंभूराजेंना अभिवादन(Statue Of Hindubhushan) करावे.”
— महेश लांडगे
