प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यामुळे सदर पद सध्या रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील सखोल अनुभव असलेल्या शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे केली (City Engineer PCMC)आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, शहर अभियंता हे पद महापालिकेच्या विकासकामांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. नगररचना, रस्ते, पूल, जलनिस्सारण, मलनिस्सारण व्यवस्था, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती, स्ट्रीट लाईटिंग, बांधकाम परवाने तसेच दीर्घकालीन विकास आराखडा (Development Plan) यांसारख्या महत्त्वाच्या बाबी थेट या पदाशी संबंधित (City Engineer PCMC)आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वेगाने शहरीकरण होत आहे. अशा परिस्थितीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय गरजांसोबतच राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय सेवेतून आलेला अनुभवी अधिकारी अधिक सक्षम ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त (City Engineer PCMC)केले.
शहर अभियंत्यावर पायाभूत सुविधांची आखणी, रचना, अंमलबजावणी व देखभाल याची मोठी जबाबदारी असते. त्याचबरोबर नवीन विकास प्रकल्पांचे व्यवस्थापन, सध्याच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, कंत्राटदारांशी समन्वय, बजेटमध्ये काम पूर्ण करणे, विविध विभागांना तांत्रिक सहाय्य पुरवणे तसेच जटिल अभियांत्रिकी समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक( City Engineer PCMC)असते.
याशिवाय, शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी झोनिंग, भूमी वापर अभ्यास, कायदेशीर व प्रशासकीय नियमांचे पालन, महापालिकेतील महापौर व पदाधिकाऱ्यांना प्रकल्प प्रगतीबाबत अहवाल सादर करणे, तसेच अभियांत्रिकी व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण व मूल्यांकन करण्याची जबाबदारीही शहर अभियंत्यावर(City Engineer PCMC)असते.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासाच्या दृष्टीने शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील किंवा तत्सम अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली (City Engineer PCMC)आहे.
