(पवनानगर, दि. २४ जुलै (रात्री ८.००) : पवना धरण सध्या ९७ टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवार (२४ जुलै) रात्री ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रातील विसर्ग ५,६०० क्युसेकवरून वाढवून ७,००० क्युसेक करण्यात आला (Pawna Dam discharge)आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ९,००० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. विसर्गात पुढील कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार (Pawna Dam discharge)आहे.
सततच्या पावसामुळे ओढे, नाले आणि पवना नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पवना नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले (Pawna Dam discharge)आहे.
नदीपात्रातील साहित्य, शेतीची अवजारे, कृषी पंप तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने केले (Pawna Dam discharge)आहे.
