(पिंपरी,प्रतिनिधी दि. ९ जुलै २०२६ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसदस्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा १३ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी (Prabhag Samiti Chairman) दिली.
प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. या कालावधीत भाजपकडून प्रत्येक प्रभागासाठी एक अशा एकूण १० नगरसदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मात्र एकाही नगरसदस्याने अर्ज दाखल केला (Prabhag Samiti Chairman)नाही.
त्यामुळे सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली (Prabhag Samiti Chairman) आहे.
निवड झालेल्या अध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे आहे –
प्रभाग अ (राजगड) – अर्चना करांडे
प्रभाग ब (सिंहगड) – मंदार देशपांडे
प्रभाग क (विजयदुर्ग) – निखिल बोऱ्हाडे
प्रभाग ड (देवगिरी) – सविता खुळे
प्रभाग इ (शिवनेरी) – अर्चना सस्ते
प्रभाग फ (तोरणा) – शिवानी नरळे
प्रभाग ग (पुरंदर) – मनीषा पवार
प्रभाग ह (प्रतापगड) – तृप्ती कांबळे
प्रभाग ज (रायगड) – आरती चोंधे
प्रभाग ल (लोहगड) – रेखा देवकर

१३ जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी या निवडीची अधिकृत घोषणा करणार असून त्यानंतर नव्या अध्यक्षांचा कार्यभार सुरू होणार (Prabhag Samiti Chairman) आहे.
