(विवेक कुलकर्णी ):आयरलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आणि त्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की पत्करलेल्या भारतीय संघाने अखेर विजयी मार्गावर पुनरागमन केले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ६ गडी आणि २८ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे नव्या कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला (IND vs ENG 1st ODI )आहे .
तब्बल तीन वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह हे या सामन्याचे मोठे आकर्षण ठरले. वेग, अचूकता आणि अनुभव यांच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा आपण अद्यापही भारतीय गोलंदाजीचे ‘ब्रह्मास्त्र’ असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनीही प्रभावी गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली(IND vs ENG 1st ODI ) नाही.
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी ६० धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली. गुरनूर ब्रारने एका षटकात दोन महत्त्वाचे बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जोस बटलरही स्वस्तात बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ६ बाद १०७ अशी(IND vs ENG 1st ODI ) झाली.
अडचणीत सापडलेल्या इंग्लंडला अनुभवी जो रूट आणि लियाम डॉसन यांनी शतकी भागीदारी करत सावरले. दोघांनी संयमी आणि जबाबदारीची फलंदाजी करत संघाला स्पर्धात्मक धावसंख्या उभारून दिली. रूटने नाबाद ७५, डॉसनने ६८, तर डकेटने ४३ धावांचे योगदान दिले. अखेरीस अक्षर पटेलच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव २५९ धावांवर संपुष्टात आला. अक्षरने ४, गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी २, तर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट (IND vs ENG 1st ODI )घेतली.
२६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. रोहित शर्मा अवघ्या ११ धावांवर, तर विराट कोहली ५ धावांवर बाद झाल्याने भारतावर पुन्हा पराभवाचे सावट दिसू लागले. अशा वेळी कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी रचत डाव (IND vs ENG 1st ODI )सावरला.
गिल अतिशय सहज आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करत शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला आणि निवृत्त होऊन मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बढती देण्यात आली. मात्र त्याच्या चुकीच्या धावबादच्या कॉलमुळे श्रेयस अय्यर ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेचच के. एल. राहुलही स्वस्तात माघारी परतल्याने भारत पुन्हा अडचणीत (IND vs ENG 1st ODI )सापडला.
मात्र संकटसमयी पुन्हा एकदा ‘बापू’ अर्थात अक्षर पटेल भारताच्या मदतीला धावून आला. वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने त्याने संयमी आणि जबाबदारीची भागीदारी रचत इंग्लंडच्या हातातून सामना हिसकावून घेतला. दोघांनी अर्धशतके पूर्ण करत भारताला ४५व्या षटकातच विजय मिळवून दिला. अक्षरने आपल्या कारकिर्दीतील चौथे एकदिवसीय अर्धशतक झळकावत पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले महत्त्व सिद्ध केले, तर वॉशिंग्टन सुंदरनेही शांत, संयमी आणि परिपक्व खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा (IND vs ENG 1st ODI )उचलला.

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात (IND vs ENG 1st ODI )आले.
सलग मालिकांतील अपयशानंतर मिळालेला हा विजय भारतीय संघासाठी केवळ दोन गुणांचा नाही, तर आत्मविश्वास परत मिळवून देणारा आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होणार असून तो जिंकत भारताने मालिका खिशात घालावी, अशी अपेक्षा आता भारतीय क्रिकेटप्रेमी व्यक्त करत (IND vs ENG 1st ODI )आहेत.

