प्रतिनिधी :टोकियो (जपान), दि. ८ मार्च २०२६ (रविवार): जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापना वर्षपूर्ती निमित्ताने “शिव-संस्कृती दर्शन सोहळा” या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा इंडो-जपान वन इंडिया फेस्टिवल (वर्ष २ रे) अंतर्गत साजरा केला जाणार (Shiv Sanskriti Darsha)आहे.
हा कार्यक्रम All-Japan Association of Indians (AJAI), Edogawa India Culture Center (EICC) आणि अमरवानी फौंडेशन (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. गतवर्षी टोकियो येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या वर्षपूर्तीचा हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार( Shiv Sanskriti Darshan)आहे.
कार्यक्रमाला जपानमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असून, अंदाजे ८०० ते १००० भारतीय बांधवांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच भारतातूनही सुमारे १०० ते १५० प्रतिनिधी विशेष उपस्थित राहणार आहेत.यात पिंपरी चिंचवड येथील मोरया देवस्थानचे विश्वस्त केशव विद्वान्स यांचाही विशेष समावेश आहे.भारत-जपान सांस्कृतिक मैत्री आणि ऐतिहासिक परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा दोन्ही देशांतील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरणार (Shiv Sanskriti Darshan) आहे.
या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजकत्व जपान इंटरनॅशनल कॉऑपेरेशन एजन्सी (JICA) यांच्याकडे आहे. कार्यक्रमाद्वारे शिवकालीन परंपरा, संस्कृती आणि स्वराज्याची प्रेरणा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा आयोजकांचा संकल्प आहे अशी माहिती मोरया देवस्थानचे विश्व्स्त केशव उमेश विद्वांस यांनी (Shiv Sanskriti Darshan) दिली आहे.
