पिंपरी, दि. 31 मे : व्हीआयपी बंदोबस्त आणि दैनंदिन कामकाजाच्या व्यस्ततेतही वाकड वाहतूक विभागातील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत एका नेपाळी अनाथ मुलीला सुरक्षितपणे तिच्या नातेवाईकांकडे पोहोचवले. या संवेदनशील कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत (Social Responsibility)आहे.
भुजबळ चौक पुलाखालील वाकड वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर एक अल्पवयीन मुलगी रडत बसल्याचे पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांच्या निदर्शनास आले. चौकशीदरम्यान तिने आपले नाव सुनिता ईश्वर सिंग बोहरा (रा. नेपाळ) असे सांगितले. घरकामासाठी तिला बेंगळुरू येथे आणण्यात आले होते. मात्र मेहनताना मागितल्यानंतर संबंधित महिलेने तिला धमकावून वाकड परिसरात बेवारस सोडल्याचे समोर (Social Responsibility)आले.
हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांनी तिला धीर देत चहा-नाश्त्याची व्यवस्था केली आणि तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष तसेच वाकड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मुलीकडील ओळखपत्राच्या आधारे तिच्या कोल्हापूर येथील नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश (Social Responsibility)आले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करून मुलीच्या प्रवासाची व्यवस्था केली. नातेवाईकांशी संपर्क साधून तिला सुरक्षितपणे बसने कोल्हापूरला रवाना करण्यात (Social Responsibility)आले.
या कार्यात हवालदार रोहिदास बोऱ्हाडे, महिला पोलीस शिपाई वैशाली लोंढे, पोलीस हवालदार बापू पोटे तसेच दामिनी मार्शल पथकाचे मोलाचे योगदान राहिले. पोलिसांच्या या मानवतावादी कृतीमुळे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला(Social Responsibility) आहे.
