(विवेक कुलकर्णी )पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी प्राधिकरण हा शहराचा एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित परिसर. सुशिक्षित, उच्चभ्रू आणि जागरूक नागरिकांचा परिसर म्हणून प्राधिकरणची स्वतंत्र ओळख आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून याच प्राधिकरण परिसरातील नागरिक काहीसे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेच्या केंद्रस्थानी आहे महापालिकेचा ‘हरीत सेतू’ (Harit Setu Nigdi)प्रकल्प.
रस्ते सुंदर असावेत, परिसर सुशोभित असावा, पादचारी सुरक्षितपणे चालावेत, शहर आधुनिक दिसावे, याला कोणत्याही नागरिकाचा विरोध असण्याचे कारण नाही. उलट, प्रत्येक नागरिकाला आपल्या परिसराचा नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास झालेला पाहायला आवडतो. मात्र, विकासाच्या नावाखाली उपलब्ध असलेले रस्तेच अरुंद होणार असतील, वाहतूक कोंडी वाढणार असेल आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न अधिक गंभीर होणार असेल, तर या विकासाच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक(Harit Setu Nigdi) आहे.
परदेशातील शहरांमध्ये रस्ते प्रशस्त आहेत, पादचारी मार्ग आखीव-रेखीव आहेत, वाहतुकीचे नियोजन काटेकोर आहे. पण तेथील परिस्थिती आणि प्राधिकरणची वस्तुस्थिती एकसारखी आहे का? हा मूलभूत प्रश्न महापालिका प्रशासनाने स्वतःला विचारण्याची गरज (Harit Setu Nigdi)आहे.
प्राधिकरणमध्ये आधीच अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा ताण आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळेत कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, शाळांच्या बस, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या कडेला होणारी अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग, व्यावसायिक आस्थापनांची गर्दी आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली(Harit Setu Nigdi) आहे.
अशा परिस्थितीत रस्त्याचा काही भाग मोठ्या आकाराच्या फुटपाथसाठी वापरला जात असेल, तर उरलेल्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होणार नाही का? रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी किती उरणार? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा इतर अत्यावश्यक सेवा सहजपणे मार्गक्रमण करू शकतील का? शाळा सुटण्याच्या आणि कार्यालये भरण्याच्या वेळेत निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन (Harit Setu Nigdi)काय?
हे प्रश्न केवळ विरोधासाठी नाहीत. हे प्रश्न प्राधिकरणमध्ये दररोज रस्त्यावर उतरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आहेत.
हरीत सेतूच्या कामामुळे काही रस्त्यांवरील उपलब्ध जागेचे प्रमाण बदलत असल्याने वाहतुकीवर त्याचा नेमका काय परिणाम होणार, याचा स्वतंत्र आणि पारदर्शक वाहतूक अभ्यास करण्यात आला आहे का? केला असेल तर तो नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे का? फुटपाथची रुंदी निश्चित करताना प्रत्यक्ष रस्त्यावरील वाहतूक, पार्किंग, अतिक्रमणे आणि भविष्यातील वाहनसंख्या यांचा विचार करण्यात आला आहे(Harit Setu Nigdi) का?की आधी आराखडा तयार झाला आणि आता त्यानुसार रस्ते बसवण्याचे काम सुरू आहे?हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण ‘सुशोभीकरण’ हा शब्द ऐकायला आकर्षक असला तरी नागरिकांच्या रोजच्या जीवनात त्याचे रूपांतर जर ‘कोंडी’मध्ये होत असेल, तर त्या सुशोभीकरणाचा नेमका उपयोग (Harit Setu Nigdi)कोणाला ?
याच प्रश्नावर प्राधिकरणमधील सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ‘NPRF’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून निगडी, प्राधिकरण आणि रावेत परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिक एकत्र आले आहेत. ‘हरीत सेतू हटाव’ ही मागणी मागील काही महिन्यांपासून नागरिकांनी लावून धरली (Harit Setu Nigdi)आहे.
विशेष म्हणजे, या प्रभागातील चारही नगरसेवकांच्या कानावरही नागरिकांची भूमिका पोहोचवण्यात आली आहे. निवेदने देण्यात आली, आंदोलन झाले, प्रश्न उपस्थित करण्यात आले. यापूर्वी ‘माझपिंपरी-चिंचवड’नेदेखील या नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेत प्रशासनाला वारंवार जाब विचारला(Harit Setu Nigdi) आहे.
मात्र, नागरिकांचा विरोध, निवेदने आणि आंदोलन यानंतरही प्रकल्पाचे काम थांबलेले नाही. पावसाळ्याने शहरातील अनेक कामांना ब्रेक लागला असताना प्राधिकरणमधील हरीत सेतूचे काम मात्र सुरूच राहिले. दिवसेंदिवस कामाचा वेग वाढताना दिसत(Harit Setu Nigdi) आहे.
यामुळे आता नागरिकांचा प्रश्न अधिक थेट झाला आहे—
हरीत सेतू नेमका कोणाच्या हितासाठी?
नागरिकांच्या सोयीसाठी असेल, तर नागरिकच त्याला विरोध का करत आहेत? शहर सुंदर करण्यासाठी असेल, तर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक विस्कळीत होण्याचा धोका का निर्माण होत आहे?पादचाऱ्यांसाठी असेल, तर वाहनचालक आणि पादचारी दोघांचीही सुरक्षितता लक्षात घेऊन संपूर्ण वाहतूक आराखडा का जाहीर केला जात नाही?आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या प्रकल्पाचा उद्देश नागरिकांचे जीवन सुसह्य करणे असेल, तर त्याच नागरिकांना विश्वासात न घेता तो रेटून नेण्याची घाई नेमकी(Harit Setu Nigdi) कशासाठी?
नागरिकांचा विकासाला विरोध नाही. विरोध आहे तो नियोजनाच्या अभावाला. विरोध आहे तो प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता होणाऱ्या कामाला. विरोध आहे तो रस्ते अरुंद करून वाहतुकीची समस्या वाढविणाऱ्या(Harit Setu Nigdi) पद्धतीला.
आज प्राधिकरणमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ही केवळ काही नागरिकांची नाराजी म्हणून प्रशासनाने दुर्लक्षित केली, तर उद्या हीच नाराजी मोठ्या नागरी आंदोलनाचे रूप घेऊ(Harit Setu Nigdi) शकते.
महापालिका प्रशासनाने आता हट्ट न करता संवादाची भूमिका घ्यावी. हरीत सेतूचा स्वतंत्र वाहतूक परिणाम अभ्यास करावा, नागरिकांच्या हरकती ऐकाव्यात, आवश्यक ठिकाणी आराखड्यात बदल करावेत आणि प्रकल्प खरोखरच नागरिकांच्या हिताचा आहे हे कृतीतून सिद्ध (Harit Setu Nigdi)करावे.

अन्यथा ‘हरीत सेतू’च्या नावाखाली प्राधिकरणला नेमके काय मिळणार—हिरवाई, सुशोभीकरण आणि सुविधा की अरुंद रस्ते, वाढती वाहतूक कोंडी आणि रोजचा(Harit Setu Nigdi) मनस्ताप?
या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनानेच द्यायचे आहे.
कारण शहर नागरिकांसाठी असते; केवळ प्रकल्पांसाठी नाही, बरोबर (Harit Setu Nigdi)ना?
