(प्रतिनिधी पुणे, 20 जून 2026 ): विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे ‘करिअर सिरीज : यशाच्या वेगळ्या वाटा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ या एक महिन्याच्या मोफत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा समारोप उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित ‘बक्षीस वितरण व कौतुक सोहळ्या’त जर्मन लँग्वेज A ग्रेड परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसह दहावीच्या परीक्षेत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या 31 विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात (German Language Booster)आला.
महासंघाच्या वतीने या विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत जर्मनीमध्ये मोफत शिक्षण, स्टायपेंडसह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात (German Language Booster)आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका स्वरदाताई बापट आणि नगरसेविका स्वप्नालीताई पंडित उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे मुख्य कार्यवाहक समीर दरेकर यांनी(German Language Booster) केले.
जर्मन लँग्वेज A ग्रेड परीक्षेत ऋग्वेदी अरु यांनी प्रथम, वेदांत जगताप यांनी द्वितीय, तर प्राजक्ता घोडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अनन्या काळे, भार्गव घेनंद, सिद्धांत दरेकर आणि आरव पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात (German Language Booster)आली.
विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांसोबत अनेक ज्येष्ठ पालकांनीही जर्मन भाषा शिकण्याबाबत उत्साह दाखवला. त्यापैकी विजया देशमुख आणि सुनील हांडे यांना ‘आउटस्टँडिंग परफॉर्मर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मन भाषा प्रशिक्षक नियाथ बनसोडे यांना विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या 5 स्टार रेटिंगच्या आधारे ‘बेस्ट टीचर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात(German Language Booster )आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघाच्या वतीने कल्पना मोरे, प्रीतम तिखे, फारुख तांबोळी, हर्षद छल्लारे, पुरुषोत्तम पंडित आणि विशाल बनसोडे यांनी विशेष परिश्रम(German Language Booster) घेतले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. 1 यांच्या मुख्याध्यापिका वीणा नाईक, डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन यांच्या मुख्याध्यापिका उज्वला कदम, तसेच ज्येष्ठ शिक्षक जयवंत बोरसे, विष्णू सुर्वे आणि विठ्ठल भरेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिक्षण, उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरविषयक मौल्यवान मार्गदर्शन (German Language Booster)केले.
विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे भविष्यातही अशा प्रकारचे जर्मन भाषा प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात (German Language Booster)आले.
