(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या क्षेत्रीय कार्यालयासाठी सुविधा आणि उद्यान विभागातील मनुष्यबळासह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना सभेत मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
महापालिकेच्या संगणक यंत्रणेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी तीन हजार अँटी-व्हायरस प्रणाली खरेदी करण्यास तसेच तीन वर्षांसाठी सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे विविध विभागांच्या संगणकीय प्रणालींची सुरक्षा आणि तांत्रिक देखभाल अधिक प्रभावीपणे करता येणार (PCMC Standing Committee)आहे.
नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्य दुरुस्ती, नाशिक फाटा-वाकड कॉरिडॉरची देखभाल-दुरुस्ती तसेच औंध-रावेत बीआरटीएस मार्गावरील बसथांबे व स्थापत्य सुविधांच्या सुधारणा करण्यासही मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
महापालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांपैकी नव्याने कार्यान्वित ‘लोहगड’ क्षेत्रीय कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व स्थापत्य कामांना मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती सभागृह, प्रभाग अध्यक्ष कक्ष, क्षेत्रीय अधिकारी व लेखा विभागासाठी कक्ष, कॅश काउंटर तसेच अभियंत्यांसाठी कार्यालयीन सुविधांचा समावेश (PCMC Standing Committee)आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच कान, नाक व घसा विभागातील वैद्यकीय उपकरणाच्या पुढील एक वर्षाच्या सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्तीला मान्यता देण्यात(PCMC Standing Committee) आली.
प्रभाग क्रमांक १२ आणि १ मधील विविध महापालिका कार्यक्रमांसाठी मंडप व अनुषंगिक व्यवस्था करण्यास मंजुरी देण्यात आली. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली. या परिसरात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा आणि एलईडी प्रकाश व्यवस्था प्रस्तावित(PCMC Standing Committee) आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील एमआयडीसी परिसरातील रस्ते आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी QCBS पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
उद्यान विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन पाच उद्यान अधिकारी आणि तीन सहाय्यक उद्यान अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर पुनर्नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील ३० डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण आणि दोन लाख देशी झाडांच्या लागवडीसह विविध कामांसाठी या मनुष्यबळाचा उपयोग होणार (PCMC Standing Committee)आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ सात दिवस आयोजित करण्यासही मंजुरी देण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, कवी संमेलन, पुस्तक खरेदी, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, एलईडी स्क्रीन आणि प्रसिद्धी व्यवस्थेचा समावेश(PCMC Standing Committee) असेल.
पिंपळे सौदागरमधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याच्या विकासकामासोबत अधिक क्षमतेच्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात(PCMC Standing Committee) आला.
शहरातील विविध पाण्याच्या टाक्या, जलक्षेत्र, पाइपलाइन आणि पंपिंग केंद्रांच्या परिचालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. बोपखेल, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, पिंपरी, चिखली, जाधववाडी यांसह विविध भागांतील पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध भागांसाठी आवश्यक मजूर, वाहनचालक तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “नियमित पाणीपुरवठा, रस्ते व बीआरटीएससारख्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवांसाठी आवश्यक साहित्य आणि महापालिकेची डिजिटल सुरक्षा यांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकहित, सेवांची गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता केंद्रस्थानी ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती कार्यरत(PCMC Standing Committee) राहील.”
