पुणे, दि. ८ मे २०२६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (FYJC Admission) शून्य फेरी आणि नियमित CAP फेरी-1 चे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली (FYJC Admission 2026) आहे.
संचालनालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी भाग-1 भरून नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले (FYJC Admission 2026)आहे.
प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल फेरी तसेच व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठी विशेष शून्य फेरीचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती नोंदविण्याची मुभा देण्यात आली(FYJC Admission 2026) आहे.
शून्य फेरीचे महत्त्वाचे वेळापत्रक
८ मे ते १० मे : विद्यार्थी नोंदणी व भाग-१ ऑनलाइन सादर करणे
११ मे ते १३ मे : तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
१४ मे ते १५ मे : हरकती व दुरुस्ती प्रक्रिया
१६ मे : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
१८ ते २० मे : व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्याक कोट्यासाठी शून्य फेरी(FYJC Admission 2026) प्रक्रिया
नियमित CAP फेरी-1 चे वेळापत्रक
२१ मे ते २२ मे : नवीन नोंदणी व पसंतीक्रम भरणे
२३ मे ते २६ मे : अलॉटमेंट प्रक्रिया
२६ मे : प्रवेश यादी व कट-ऑफ जाहीर
२६ मे ते २८ मे : विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
२९ मे : रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध
३० मे : दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत मदतीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून ८५३०९५५५६४ हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करण्यात आला (FYJC Admission 2026) आहे.
