चिंचवड, दि. २३ : निगडी येथील अप्पू घर मनोरंजन केंद्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, स्वराज्याची स्थापना तसेच त्यांच्या प्रमुख किल्ल्यांवरील ऐतिहासिक माहिती दर्शविणारा सुमारे ३० मिनिटांचा ‘स्वराज्य की लढाई’ हा माहितीपट येत्या २४ ते २६ जानेवारी या कालावधीत मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती अप्पू घरचे मुख्य संचालक डॉ. राजेश मेहता यांनी (Appu Ghar Mahotsav)दिली.
हा माहितीपट अप्पू घर येथील मिनी थिएटरमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सादर करण्यात येणार आहे. मात्र, अप्पू घरमध्ये प्रवेशासाठी असलेले नियमित प्रवेश शुल्क प्रत्येकाला भरावे लागेल, असेही डॉ. मेहता यांनी स्पष्ट (Appu Ghar Mahotsav) केले.
डॉ. मेहता पुढे म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो आपल्या संविधान, इतिहास आणि स्वराज्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. मनोरंजनासोबत शिक्षण देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, ग्रामीण भाग तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ अप्पू घर हे विश्वासार्ह मनोरंजन केंद्र म्हणून ओळखले जाते. या उपक्रमातून देशभक्ती, इतिहास आणि कुटुंबीयांचे मनोरंजन यांचा सुंदर संगम साधला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद (Appu Ghar Mahotsav)केले.
सध्या अप्पू घर येथील मिनी थिएटरमध्ये हा माहितीपट पाहण्यासाठी प्रति व्यक्ती ६० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २४ ते २६ जानेवारीदरम्यान कोणत्याही वयोगटातील नागरिकांकडून माहितीपटासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा माहितीपट पूर्णतः मोफत असणार (Appu Ghar Mahotsav)आहे.
तसेच, या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांसाठी तात्पुरत्या टॅटू पेंटिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, मुलांसह येणाऱ्या कुटुंबीयांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती अप्पू घरचे व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे (मो. ९९२३९७७४५) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
