पिंपरी प्रतिनिधी:चिखली–कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत बांधकामे आणि परदेशी नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर राज्य सरकारने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. सर्व यंत्रणांना ‘नो-टॉलरन्स’ धोरणानुसार तातडीने आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह (शहरे) विभागाने कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर तातडीने मोहीम राबविण्याचे निर्देश जारी केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही परदेशी नागरिक आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास आणि अटक कारवाया अधिक काटेकोरपणे करण्याची तयारी दर्शवली (Mahesh Landge Followup )आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली–कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित हजारो अनधिकृत झोपड्या, पत्र्यांची शेड्स, बांधकामे व अवैध भंगार अड्डे हटविले होते. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे आणि परिसराचा नियोजित विकास गतीमान करणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली होती. तथापि, काही बेकायदेशीर भंगार दुकाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने अधिक व्यापक आणि कठोर कारवाईचे आदेश दिले (Mahesh Landge Followup )आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर गृहविभागाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला. आतापर्यंत भंगार दुकाने व बेकायदेशीर वास्तव्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पुढील काळातही ही मोहीम अधिक कठोरपणे सुरूच राहील, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट (Mahesh Landge Followup ) केले आहे.
बेकायदेशीर वास्तव्याचा पर्दाफाश
27 मार्च 2025 रोजी चिखली पोलिसांनी तळवडे येथे केलेल्या तपासात दोन महिला आणि एका किशोरवयीन मुलाचा परदेशी नागरिक म्हणून उलगडा झाला. त्यांचा टुरिस्ट व्हिसा 2022 मध्येच संपला होता. तपासात एका व्यक्तीने त्यांचे पासपोर्ट जाळून पुरावे नष्ट केले आणि आधार, पॅन, मतदान ओळखपत्र यांसारखे बनावट दस्तऐवज तयार करून ‘भारतीय’ ओळख निर्माण केल्याचेही समोर आले. या प्रकरणी परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि फसवणूक या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल (Mahesh Landge Followup ) करण्यात आले आहेत.
शासनाचे नवे आदेश
27 जून 2025 रोजी शासनाने विशेष परिपत्रक जाहीर करून चिखली–कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि भंगार व्यवसायांविरुद्ध समन्वित मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस, महापालिका आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकांद्वारे अटक, तपास, दस्तऐवजांची छाननी आणि सत्यापनाच्या कारवाया (Mahesh Landge Followup )सातत्याने चालू राहणार आहेत.
“कुदळवाडी–चिखली परिसरातील अनधिकृत भंगार दुकाने, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर वास्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. फेब्रुवारीतील अतिक्रमण कारवाईप्रमाणेच आणखी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांची सुरक्षितता, नदी प्रदूषण प्रतिबंध आणि नियोजित विकास हेच (Mahesh Landge Followup ) आमचे प्राधान्य.”
— महेश लांडगे, आमदार, पिंपरी-चिंचवड (भाजपा)
