(चिंचवड,प्रतिनिधी ता. १७) : सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना करण्यात आली (Pratibha College Chinchwad )आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांचे सहकार्य लाभले (Pratibha College Chinchwad )आहे.
डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती मोहिमा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी (Pratibha College Chinchwad )दिली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयातील उत्साही, जबाबदार आणि नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता तसेच सायबर सुरक्षेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार(Pratibha College Chinchwad ) आहे.
क्लब ऑफिसर्सचा पदग्रहण सोहळा नुकताच क्विक हील फाउंडेशनच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर, असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के, सीएसआर एक्झिक्युटिव्ह गायत्री पवार-केसकर तसेच दिपू सिंह यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षितता, सायबर सुरक्षेचे महत्त्व, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि जनजागृती उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण (Pratibha College Chinchwad )दिले.
क्लबचे पदाधिकारी
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबच्या अध्यक्षपदी विद्यार्थिनी स्नेहा तेली, सचिवपदी पियुषा रोहम, उपक्रम प्रमुखपदी साकीब चौधरी, तर मीडिया प्रमुखपदी सिमरन यादव यांची निवड करण्यात आली (Pratibha College Chinchwad )आहे.
डॉ. हर्षिता वाच्छानी या शिक्षक समन्वयक म्हणून कार्य पाहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विविध सायबर जनजागृती उपक्रम राबविणार (Pratibha College Chinchwad )आहेत.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भुपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी निवड झालेल्या सर्व क्लब ऑफिसर्सचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा (Pratibha College Chinchwad )दिल्या.
