प्रतिनिधी :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही शोककळा पसरली आहे. या अत्यंत कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत पक्षाने तातडीचा व महत्त्वाचा निर्णय घेत पुढील नेतृत्व निश्चित केले (Sunetra Pawar)आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. या निवडीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवन संकुलातील लोक भवन (Lok Bhavan) येथील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी अतिशय साधेपणाने पार पडला. मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ (Sunetra Pawar) दिली.
या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामती येथून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. शनिवारी सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग (Sunetra Pawar) आला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी देत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड जाहीर (Sunetra Pawar)केली.
यानंतर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि संजय बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. गटनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. हे पत्र पुढे राज्यपालांकडे पाठवण्यात आल्यानंतर पुढील घटनाक्रम वेगाने पूर्ण (Sunetra Pawar)झाला.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली ही मोठी जबाबदारी राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू करणारी ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत (Sunetra Pawar)आहे.


