प्राधिकरण, निगडी | प्रतिनिधी:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, शब्दरंग कला साहित्य कट्टा, भजन महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच निरामय आणि आरोग्यदायी जीवनासाठी तज्ञांशी खास संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम २३ मे रोजी निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार (Senior Citizens)पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक अतुल पाटील होते. त्यांच्या हस्ते आधुनिक उपचार प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती कैलास कुटे, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित (Senior Citizens)होते.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी गुडघेदुखी, मणक्याचे विकार, हृदयविकार आणि दैनंदिन आरोग्य समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. तज्ञांनी त्यांना योग्य जीवनशैली, वेळेवर तपासणी आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात, असा संदेश यावेळी देण्यात(Senior Citizens) आला.
यावेळी “कुटुंब आरोग्य रक्षक कार्ड” योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला आरोग्य सेवांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार (Senior Citizens)आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक अतुल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम होत असून उपचारांमध्ये अचूकता वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद(Senior Citizens) केले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वाती शितुरकर यांनी प्रथम, सुनीता भंगाले यांनी द्वितीय, सुजाता चिटणीस यांनी तृतीय, ज्ञानेश्वर शिंदे यांनी चतुर्थ तर सुनीता यन्नुवार यांनी पाचवा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण अमृता ओंबळे आणि प्राजक्ता निफाडकर यांनी (Senior Citizens)केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि ज्योती कानिटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल बोंद्रे यांनी (Senior Citizens)मानले.
