चिंचवड परिसरात खंडणीच्या वादातून दोन वेगवेगळ्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून दोन्ही प्रकरणात अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपींसह काहींना अटक केली (Chinchwad Extortion) आहे.
पहिली घटना मराठा दरबार रेस्टॉरंट अॅण्ड बार येथे घडली. या हॉटेलचे मालक आदित्य दिनकर चिंचवडे (वय २२) यांच्याकडे बसवराज शंकर हेळवे उर्फ बश्या, शुभम दत्तात्रय शिंदे, शाम शंकर कोळी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दरमहा २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. हप्ता न दिल्यास जीव घेण्याची धमकीही दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी बसवराज हेळवे आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यावर पडलेली काच उचलून चिंचवडे यांच्या डोक्यावर व कानावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी बसवराज हेळवे आणि शाम कोळी यांना (Chinchwad Extortion) अटक केली आहे.
दुसरी घटना मराठा दरबार हॉटेलसमोर घडली. आरोपी शुभम शिंदे, बसवराज हेळवे आणि शाम कोळी हे तेथे जात असताना रस्ता क्रॉस करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी त्यांचा किरकोळ वाद झाला. याच वेळी आदित्य चिंचवडे, कार्तिक घोडके, शिवम हगवणे, सुनील चिंचवडे आणि दोन अज्ञात इसमांनी हस्तक्षेप करत शुभम शिंदे आणि बसवराज हेळवे यांच्यावर हल्ला केला. आदित्य चिंचवडे याने उचललेल्या काचेचा तुकडा बसवराज हेळवे यांच्या डोक्यात फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तो चुकून त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ लागून ते गंभीर जखमी झाले. सुनील चिंचवडे यांनीही दुसरी काच उचलून शुभम शिंदे यांच्या डोक्यावर वार केला. यानंतर आरोपींच्या दोन साथीदारांनी शुभम शिंदे खाली पडल्यावर त्यांच्या हातावर लाकडाने मारहाण (Chinchwad Extortion) केली.
जखमी शुभम शिंदे आणि बसवराज हेळवे उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात जात असताना आरोपींनी दोन चारचाकी वाहनांतून त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या वाहनाला मागून तसेच बाजूने धडक देत नुकसान केले.पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांची (Chinchwad Extortion) चौकशी सुरू आहे.
