(विशेष लेख )स्टेट बँक परिवाराच्या (सांस्कृतिक संवर्धन समिती) वतीने १४ ऑगस्ट २०२६ रोजी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला तब्बल १२१ सभासदांची उत्स्फूर्त उपस्थिती (State Bank Parivar)लाभली.

‘अखंड भारत’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजी पुणे भागाचे सहकार्यवाह आणि प्रतिथयश उद्योजक श्री. आमोदजी कालगावकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. ‘अखंड भारत—इतिहास, फाळणी आणि सांस्कृतिक एकात्मता’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन (State Bank Parivar)केले.
व्याख्यानाच्या प्रारंभी आमोदजींनी भारताच्या प्राचीन संकल्पनेचा आणि सांस्कृतिक विस्ताराचा संदर्भ देताना विष्णुपुराणातील,
“उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ॥”
या प्रसिद्ध उल्लेखाचा दाखला दिला. भारत हा केवळ राजकीय सीमांनी निश्चित होणारा भूभाग नसून, हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि एकात्मतेची भावना असलेली भूमी आहे, असा विचार त्यांनी (State Bank Parivar)मांडला.
इतिहासाचे स्मरण आणि त्यातून योग्य बोध घेण्याचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी भगवद्गीतेतील,
“स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति”
या विचाराचा संदर्भ दिला.
फाळणीची पार्श्वभूमी
अखंड भारताच्या संकल्पनेचा विचार करताना भारताच्या फाळणीचा इतिहास समजून घेणे आवश्यक असल्याचे आमोदजींनी सांगितले. ब्रिटिशांची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती, तत्कालीन राजकीय परिस्थिती, विविध राजकीय संघटनांच्या भूमिका आणि हिंदू-मुस्लिम संबंधांमध्ये निर्माण झालेली दरी या विविध घटकांचा त्यांनी ऊहापोह (State Bank Parivar)केला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसची वाटचाल तसेच लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रवादी नेत्यांच्या भूमिकांचाही त्यांनी उल्लेख (State Bank Parivar)केला.
विशेषतः खिलाफत चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा संबंध, तसेच त्याचे पुढील राजकीय परिणाम यावर त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या उद्देशाने घेतलेल्या काही राजकीय निर्णयांचे पुढे अनपेक्षित परिणाम झाले, असे त्यांनी प्रतिपादन (State Bank Parivar)केले.
१९४७ ची फाळणी आणि विस्थापन
१९४७ मधील फाळणी हा भारतीय इतिहासातील अत्यंत वेदनादायी अध्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. फाळणीच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेला हिंसाचार, विस्थापन आणि कुटुंबांची झालेली वाताहत यामुळे लाखो नागरिकांना आपली घरे, व्यवसाय आणि संपत्ती सोडून निर्वासित म्हणून भारतात यावे (State Bank Parivar) लागले.
या संदर्भात लाहोर परिसरातून भारतात स्थलांतर करणाऱ्या छाबरा कुटुंबाची आणि त्यातील मथुरा देवी या तरुणीची हृदयद्रावक कहाणी त्यांनी सांगितली. फाळणीच्या हिंसाचारात कुटुंबातील अनेक सदस्य गमावल्यानंतरही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारत गाठण्याचा तिचा संघर्ष सांगताना सभागृहातील वातावरण काही क्षण भावूक (State Bank Parivar)झाले.
फाळणी ही केवळ भूभागाची विभागणी नव्हती, तर तिच्यामागे असंख्य कुटुंबांचे दुःख, विस्थापन आणि बलिदान दडलेले आहे, हे या प्रसंगातून अधोरेखित (State Bank Parivar)झाले.
काश्मीरचा प्रश्न
व्याख्यानात काश्मीरच्या विलिनीकरणाच्या इतिहासावरही सविस्तर चर्चा झाली. महाराजा हरिसिंह, पाकिस्तानकडून झालेला कबायली हल्ला, भारतात विलिनीकरणाचा निर्णय, भारतीय सैन्याची कारवाई आणि त्यानंतर झालेला युद्धविराम या घटनांचा संदर्भ आमोदजींनी (State Bank Parivar)दिला.
काश्मीर प्रश्नाच्या हाताळणीबाबत तत्कालीन नेतृत्वाच्या, विशेषतः पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निर्णयांवर त्यांनी टीका केली. युद्धविरामानंतर काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला, तसेच हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्यात आल्यामुळे तो दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिला, असे त्यांनी नमूद (State Bank Parivar) केले.
अखंड भारत : भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिक संकल्पना
व्याख्यानाच्या उत्तरार्धात आमोदजींनी ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा आजच्या काळातील व्यापक अर्थ स्पष्ट केला.
अखंड भारत म्हणजे केवळ राजकीय सीमांमध्ये बदल करून भूभाग एकत्र आणणे नव्हे, तर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाशी जोडलेल्या विविध समाजांमध्ये सांस्कृतिक आत्मीयता, परस्पर संबंध आणि एकात्मतेची भावना जागृत करणे, असा व्यापक अर्थ त्यांनी (State Bank Parivar)मांडला.
नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, इंडोनेशिया आणि थायलंड आदी देशांशी असलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांचे विविध संदर्भ त्यांनी दिले. या प्रदेशात भारतीय संस्कृतीच्या प्रभावाच्या खुणा आजही विविध स्वरूपात आढळतात, असे त्यांनी (State Bank Parivar)सांगितले.
भारताचे सामर्थ्य वाढल्यास शेजारील देशांशी सांस्कृतिक आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होऊ शकतात, असा विचारही त्यांनी व्यक्त (State Bank Parivar)केला.
इतिहासाचे स्मरण आणि पुढील पिढी
व्याख्यानाच्या समारोपात इतिहास विसरला तर भविष्य घडविण्याची क्षमता कमी होते, असे सांगून पुढील पिढीला फाळणीचा इतिहास, त्यातील वेदना आणि त्यातून घ्यावयाचा बोध सांगण्याचे आवाहन करण्यात (State Bank Parivar)आले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘आज़ादी अभी अधूरी है’ या भावनेचा संदर्भ देत, अखंड भारताचा संकल्प हा केवळ घोषवाक्य नसून इतिहासाचे स्मरण, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक आत्मभान यांचा संकल्प असावा, असे त्यांनी स्पष्ट (State Bank Parivar)केले.
व्याख्यानाला उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानानंतर काही सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विषयावर अधिक संवाद साधण्यात (State Bank Parivar)आला.
नेहमीप्रमाणेच स्टेट बँक परिवाराच्या सांस्कृतिक संवर्धन समितीने सभासदांना एका उत्तम वैचारिक मेजवानीचा आस्वाद दिल्याची भावना अनेक सभासदांनी व्यक्त (State Bank Parivar) केली.
‘स्मरणातून जागृती, जागृतीतून संकल्प आणि संकल्पातून सिद्धी’ या भावनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात (State Bank Parivar)आले.
अखंड भारत — इतिहासाचे स्मरण, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा संकल्प!
वंदे मातरम्! 🇮🇳
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो! 🇮🇳
— अतुल काटेकर
