आकुर्डी : कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने रविवारी (दि. २० सप्टेंबर) भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रमेश भोरकर आणि सुनील मोरे यांनी केले (Blood Donation Competition )आहे.
ही रक्तदान स्पर्धा रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री विठ्ठल मंदिरासमोर, संत तुकाराम महाराज पालखी तळ, आकुर्डी येथे होणार (Blood Donation Competition) आहे.
स्पर्धेत सर्वाधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अथवा सामाजिक संस्थेला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार (Blood Donation Competition)आहे.
याशिवाय रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, त्यामध्ये सायकल आणि एक ग्रॅम सोन्याचे नाणे अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार(Blood Donation Competition) आहेत.
‘रक्तदान हेच खरे मानवतेचे दान’ या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने करण्यात आले(Blood Donation Competition) आहे.
अधिक माहितीसाठी इखलास सय्यद यांच्याशी ९५५२३४५४२९ या क्रमांकावर संपर्क(Blood Donation Competition) साधावा.
