पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह विधान तातडीने हटवून जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात (Pcmc NCP Protest)आले.
यावेळी योगेश बहल म्हणाले, “सुनेत्रा पवार या राज्याच्या विकासासाठी कार्यरत असताना त्यांच्याविषयी वापरण्यात आलेली अवमानकारक भाषा ही केवळ एका महिला नेत्याचा नव्हे, तर राज्यातील सर्व महिलांच्या सन्मानाचा अपमान आहे. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. काँग्रेसने संबंधित पोस्ट हटवून तात्काळ जाहीर माफी (Pcmc NCP Protest)मागावी.”
आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, सीमा सावळे, वैशाली घोडेकर, कविता आल्हाट, राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, सारंग कामतेकर, शेखर काटे, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, स्वाती काटे, माया बारणे, पंकज भालेकर, कैलास बारणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी (Pcmc NCP Protest)झाले.
