पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी प्राधिकरण परिसरातील सेक्टर २७ ए येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या निगडी प्राधिकरण सेक्टर २७ ए येथील ओम शांती बिल्डिंगसमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, याकडे संबंधित अ प्रभाग स्थापत्य विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात (Civic Issues)आहे.
या संदर्भात नागरिकांनी अनेकदा अ प्रभागातील स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांकडून ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे काम सुरू असून फुटपाथचे काम करताना हे खड्डे बुजवले जातील, असे सांगण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी या खड्ड्यांचा त्रास सहन करावा, असा सवाल नागरिक उपस्थित करत (Civic Issues)आहेत.
या खड्ड्यांमध्ये कचरा, गवत आणि पाणी साचत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची तसेच अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियमित सफाईही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र(Civic Issues )नाराजी आहे.
“आम्ही नागरिक वेळेवर कोट्यवधी रुपयांचा कर भरतो. तरीही मूलभूत सुविधांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांनी टू-व्हीलरवरून संपूर्ण निगडी प्राधिकरण परिसरात फेरफटका मारावा, म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास त्यांच्या लक्षात येईल, अशी मागणीही करण्यात आली (Civic Issues)आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निगडी प्राधिकरणातील अनेक रस्ते मागील अनेक वर्षांपासून नव्याने डांबरीकरण करण्यात आलेले नाहीत. केवळ ठिगळे लावून तात्पुरती पॅचवर्कची कामे करण्यात आल्याने रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली (Civic Issues)आहे.
या संदर्भात स्पोर्ट्स सोशल वर्कर सुभाष राणे यांनी प्रशासनाला तातडीने दखल घेऊन संबंधित खड्डे बुजवण्याची आणि निगडी प्राधिकरणातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केलीCivic Issues) आहे.
