(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅन्टोन्मेंट येथील विद्युत दाहिनीमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली(Reshma Bapuji Katale) आहे.
प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत हे निवेदन सादर करण्यात आले. विद्युत दाहिनीमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसणे, परिसराची नियमित स्वच्छता न होणे तसेच अनेकदा विद्युत दाहिनी बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले (Reshma Bapuji Katale) आहे.
सदर विद्युत दाहिनीची तातडीने पाहणी करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, नियमित स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करणे तसेच विद्युत दाहिनी अखंडितपणे सुरू राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका कातळे यांनी केली (Reshma Bapuji Katale)आहे.
याशिवाय, संबंधित ठेकेदाराला करारातील अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि कामकाजात निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली (Reshma Bapuji Katale) आहे.

नागरिकांना अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी सन्मानपूर्वक, सुरळीत आणि विनाअडथळा सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, या प्रकरणी महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी व्यक्त (Reshma Bapuji Katale) केली.
