पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी दिलेली १० टक्के सवलत मिळविण्याची ३० जून २०२६ ही अंतिम मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जूनपर्यंत ऑनलाइन भरल्यास सामान्य करावर १० टक्के सवलत मिळणार असून, त्यानंतर ही सवलत लागू राहणार(PCMC Property Tax 2026) नाही.
महापालिका हद्दीत सुमारे ७.४४ लाख मालमत्ताधारक असून, आतापर्यंत ४.१५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरला आहे. त्यापैकी जवळपास ३.४६ लाख नागरिकांनी ऑनलाइन कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला (PCMC Property Tax 2026)आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०२६ पासून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई केली जाणार असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार (PCMC Property Tax 2026)आहे.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी भरलेला मालमत्ता कर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि इतर विकासकामांसाठी वापरला जातो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी कर (PCMC Property Tax 2026)भरावा.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही वेळेत कर भरण्याचे आवाहन करत, महसूल वाढीसाठी आणि शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तर उपायुक्त सचिन पवार यांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आणि १ जुलैनंतर सुरू होणाऱ्या विशेष वसुली मोहिमेपूर्वी थकबाकी निकाली काढण्याचे आवाहन केले(PCMC Property Tax 2026) आहे.
