अखेर रामराया आले घरी… 🙏
वडिलांची इच्छा पूर्ण झाली; पवित्र वडिलोपार्जित जागा श्रीरामचरणी अर्पण
“तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा…”
हे केवळ म्हणण्यासाठीचे शब्द नाहीत, तर आयुष्यभर जगण्याची एक वृत्ती आहे. आपल्या वाट्याला आलेले सर्व काही अखेर परमेश्वरालाच अर्पण करायचे, ही भावना मनापासून जगणाऱ्या माझ्या दादांच्या जीवनाचा तोच खरा सारांश (Shreeram Mandir Pranpratishtha)होता.
आयुष्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही मोठ्या आजाराचा स्पर्शही न झालेले दादा अचानक कॅन्सरच्या विळख्यात सापडले आणि बघता बघता काळाने त्यांना आमच्यापासून हिरावून घेतले. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या ओठांवर एकच नाव (Shreeram Mandir Pranpratishtha)होते—श्रीराम!
जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगामागे श्रीरामाचीच इच्छा असते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. आपला जीवनप्रवास आता संपणार आहे, हे समजल्यानंतरही त्यांनी त्याकडे नियती म्हणून नव्हे, तर “हीदेखील त्याचीच इच्छा आहे,” अशा विलक्षण श्रद्धेने पाहिले.केवढी ती भक्ती… आणि केवढी ती (Shreeram Mandir Pranpratishtha)श्रद्धा!
दादांच्या स्मृतीतून ‘सृजन प्रतिष्ठान’
दादा गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय करावे, हा विचार सतत मनात होता. त्यातून ‘सृजन प्रतिष्ठान’ साकारले. गेल्या सात वर्षांपासून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजदूतांचा सन्मान या माध्यमातून केला जात आहे. दादांनी दिलेल्या संस्कारांची आणि समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याची हीच एक छोटीशी आठवण आहे. हा उपक्रम पुढेही अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प(Shreeram Mandir Pranpratishtha) आहे.
मात्र, दादांचे जवळपास संपूर्ण आयुष्य ज्या पाडळी, जिल्हा बीड या गावात गेले, त्या गावासाठी काहीतरी कायमस्वरूपी करावे, ही इच्छा मनात(Shreeram Mandir Pranpratishtha) होती.
शंभर वर्षांची परंपरा श्रीरामचरणी अर्पण
आमचे वडिलोपार्जित घर… शंभर वर्षांहून अधिक काळ ज्या जागी पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आला, ती जागा आमच्यासाठी केवळ जमीन नव्हती. ती आमच्या पूर्वजांच्या आठवणींची, संस्कारांची आणि श्रद्धेची साक्ष(Shreeram Mandir Pranpratishtha) होती.
याच पवित्र वास्तूची जागा श्रीराम मंदिरासाठी अर्पण करावी, असा संकल्प मनात आला.विचार मोठा होता; पण त्याहून मोठी होती कुटुंबाची (Shreeram Mandir Pranpratishtha)श्रद्धा .
थोरल्या भावांनी काकू, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर ही भावना मांडली. कुणीही प्रश्न उपस्थित केला नाही. उलट, सर्वांनी मोठ्या मनाने या संकल्पाला होकार (Shreeram Mandir Pranpratishtha)दिला.
ज्या भूमीत आमच्या पूर्वजांनी संसार केला, जिथे पिढ्यान्पिढ्या रामजन्म साजरा झाला, तीच भूमी आता श्रीरामाच्या मंदिरासाठी अर्पण करण्याचा निर्णय झाला.ग्रामस्थांचेही लाभले सहकार्य,गावाचे तत्कालीन सरपंच श्री. रामदास हांगे दादा—नावातच ‘राम’! त्यांनीही ही कल्पना मनापासून उचलून (Shreeram Mandir Pranpratishtha)धरली.
सध्याचे सरपंच श्री. गहिनीनाथजिजा पाखरे यांनीही माझ्या सततच्या पाठपुराव्याला नाराज न होता वेळोवेळी सहकार्य केले. अनेक अडचणी, प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रयत्नांचा प्रवास पार केल्यानंतर अखेर तो मंगल दिवस उजाडला.आज सकाळी सव्वा सात वाजता श्रीरामराया पाडळीतील या पवित्र भूमीत विराजमान (Shreeram Mandir Pranpratishtha)झाले!
ज्या घरात शंभर वर्षांहून अधिक काळ रामजन्म साजरा झाला, त्याच जागी आता कायमस्वरूपी श्रीराम मंदिर उभे राहणार आहे. यापेक्षा मोठे भाग्य आणखी काय असू शकते?आज थोरले काका विठ्ठलअण्णा आणि दादा—दोघांच्याही आत्म्याला नक्कीच आनंद झाला असेल.कारण त्यांनी जपलेली श्रद्धा आता मंदिराच्या रूपाने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार(Shreeram Mandir Pranpratishtha) आहे.
हा केवळ जागा दान करण्याचा प्रसंग नाही…हा एका वडिलांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आहे.ही पूर्वजांच्या स्मृतींना दिलेली आदरांजली आहे.ही शंभर वर्षांच्या परंपरेला चिरंतन करण्याची भावना(Shreeram Mandir Pranpratishtha) आहे.
ही कुटुंबाच्या श्रद्धेचे श्रीरामचरणी केलेले समर्पण आहे.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, येणाऱ्या पिढ्यांना संस्कार, श्रद्धा आणि सेवाभावाची दिशा देणारा हा वारसा आहे.म्हणूनच कदाचित याला ‘सात पिढ्यांचा उद्धार करणारे दान’ असे म्हणावेसे (Shreeram Mandir Pranpratishtha)वाटते.
एका पिढीने जागा जपली, दुसऱ्या पिढीने श्रद्धा जपली आणि आता पुढच्या असंख्य पिढ्यांसाठी तीच जागा श्रीरामाचे धाम होणार (Shreeram Mandir Pranpratishtha)आहे.
पाडळीच्या मातीत आमच्या पूर्वजांचा घाम मिसळला आहे; आता त्याच मातीत श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श लाभणार(Shreeram Mandir Pranpratishtha) आहे.
या पवित्र कार्यासाठी भाऊ, भावंडे, काकू आणि समस्त ग्रामस्थ यांना शतशः नमन आणि मनःपूर्वक धन्यवाद.
ज्यांच्या मनात राम असतो, त्यांच्या हातून रामाचेच कार्य घडते, याचा हा जिवंत अनुभव (Shreeram Mandir Pranpratishtha)आहे.
अखेर रामराया आले घरी…
आता या घराला मंदिराचे रूप लाभेल,
या भूमीला तीर्थाचे रूप लाभेल
आणि या संकल्पाला पिढ्यान्पिढ्यांचा आशीर्वाद (Shreeram Mandir Pranpratishtha)लाभेल.
जय श्रीराम! 🙏
सर्वांचे भले करो.
“झाले रामराज्य, काय उणे आम्हासी…”
“धरणी धरे (Shreeram Mandir Pranpratishtha)पिके…”
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
