(पिंपरी-चिंचवड (दि. ९)) : शहरातील स्मशानभूमींमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी विविध स्मशानभूमींचे ‘ग्राऊंड ऑडिट’ केले. ताथवडे, चिखली (टाळगाव), नेहरुनगर, मोरवाडी आणि मोशी येथील पाहणीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था आणि कामगारांसाठी सुरक्षा साहित्याचा अभाव असल्याचे निदर्शनास (Pcmc Crematorium)आले.
ताथवडे स्मशानभूमीत सहा कामगार कार्यरत असतानाही रात्री केवळ एकच कामगार उपस्थित असल्याचे आढळले. कामगारांना पिण्याचे पाणी व सुरक्षा किट नसून नदीतून बाहेर येताना सुरक्षिततेसाठी आवश्यक ग्रीलही नसल्याचे मोरे यांनी (Pcmc Crematorium)सांगितले.
चिखली (टाळगाव) येथे स्वच्छतागृहात पाण्याची सुविधा नसून परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होती. चेंजिंग रूममध्ये पाणी साचलेले असून पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे(Pcmc Crematorium) आढळले.
नेहरुनगर स्मशानभूमीत कार्यालयात मद्यप्राशन होत असल्याचे आढळल्याचा दावा मोरे यांनी केला. विद्युत दाहिनी बंद असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. स्वच्छतागृह, पाणी फिल्टर आणि चेंजिंग रूमही बंद असल्याचे त्यांनी (Pcmc Crematorium)सांगितले.
मोरवाडी स्मशानभूमीत कचरा व गवताचे साम्राज्य असून धुराची चिमणी तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. कामगारांना सुरक्षा किट नसल्याचेही त्यांनी (Pcmc Crematorium)सांगितले.
मोशी स्मशानभूमीत पाहणीवेळी एकही कामगार उपस्थित नव्हता. स्वच्छतागृह बंद, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, चिखल-कचरा, नदीकाठच्या पायऱ्यांना सुरक्षा ग्रीलचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न अशा अनेक त्रुटी आढळल्या. यावेळी नगरसेविका सारिका गायकवाड उपस्थित होत्या. कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात (Pcmc Crematorium)आली.
“स्मशानभूमी ही नागरिकांच्या अत्यंत संवेदनशील प्रसंगाशी संबंधित जागा आहे. येथे स्वच्छता, पाणी, सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रशासनाने या त्रुटींची तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी शैलजा मोरे यांनी केली.
शहरातील स्मशानभूमींच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या गंभीर त्रुटींसाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
