(पिंपरी-चिंचवड, दि. २० जुलै २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे राबविलेल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील किमान एका झोपडपट्टीत हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले (Dr.Vijay Suryavanshi)आहेत.
या उपक्रमांतर्गत कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, घरगुती कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी महिला बचत गट, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग राहणार(Dr.Vijay Suryavanshi) आहे.
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे सुरक्षित, विकेंद्रित आणि शाश्वत व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उपक्रमामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास, उगमस्थानी कचरा वर्गीकरणाला चालना मिळण्यास तसेच परिसर अधिक स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत होणार (Dr.Vijay Suryavanshi)आहे.
गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथील यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर आपल्या कार्यक्षेत्रातील योग्य झोपडपट्टीची निवड करावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने १५ ऑगस्टपूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले (Dr.Vijay Suryavanshi)आहेत.
या उपक्रमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात (Dr.Vijay Suryavanshi)आहे.
