पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (11 जून) सायंकाळी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या पार्किंग परिसरात करण्यात (PCMC Bribery Case)आली.
उमेश अरुण लोंढे (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) म्हणून कार्यरत आहेत. तसेच पिंपळे गुरव परिसरातील अतिक्रमणविरोधी विभागात बीट निरीक्षक म्हणूनही ते काम पाहत(PCMC Bribery Case) होते.
तक्रारदाराच्या मालकीच्या पिंपळे गुरव येथील तीन मजली इमारतीस महापालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बांधकाम नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाही आरोपीने कारवाई टाळण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात(PCMC Bribery Case) आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये उमेश लोंढे यांनी तक्रारदाराकडून 70 हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात(PCMC Bribery Case) आले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निबाळकर करीत आहेत. एसीबीने नागरिकांना लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले (PCMC Bribery Case)आहे .
