पिंपरी-चिंचवड : पोलिसांसोबत ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करणारा तरुणच चोरीच्या गुन्ह्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलिसांनी सचिन मानसिंग चव्हाण (वय २७, रा. बोडकेवस्ती, माण) याला अटक केली (Vehicle Theft Case) आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी थेरगाव येथील गणेश मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Vehicle Theft Case) होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपीचा मार्ग निश्चित करून त्याला माण येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने थेरगावमधील चोरीसह आणखी एका चोरीची कबुली दिली. तसेच चतुःशृंगी परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग समोर आला(Vehicle Theft Case) आहे.
पोलिसांनी आरोपीकडून दोन दुचाकी आणि २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला (Vehicle Theft Case) आहे.
दरम्यान, सचिन चव्हाण हा यापूर्वी चतुःशृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत होता. मात्र वर्तणूक चांगली नसल्याने सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्याला सेवेतून कमी करण्यात आले होते. त्यानंतर वाहतूक विभागाने जप्त केलेली एक मोपेड चोरून त्याच वाहनाचा वापर गुन्हे करण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले(Vehicle Theft Case) आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग, पोलिस निरीक्षक किशोर पाटील आणि त्यांच्या पथकाने(Vehicle Theft Case) केली.
