(पिंपरी, प्रतिनिधी ): पत्रकार हे समाजातील विविध घडामोडी, नागरिकांच्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करीत असतात. वृत्तसंकलनासाठी पत्रकारांना अनेकदा दुचाकीवरून धावपळ करावी लागते. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी आणि पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि अनुकरणीय असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त (Journalists Safety)केले .
या उपक्रमास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, नगरसेवक विकास साने, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर, सचिव डॉ. अमित त्रिपाठी, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, रो. संतोष मोरे, रो. दीपक सोनवणे, प्रशासकीय संचालक केशव काळदाते, खजिनदार सुनील पाटील, रो. अविनाश तळवले, रो. स्वप्नील भालेराव तसेच पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे आदी मान्यवर उपस्थित(Journalists Safety) होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दीपक सोनवणे यांनी केले. पत्रकार हे लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून, समाजातील विविध घटना, प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी प्रशासन व समाजासमोर मांडण्याचे काम ते करीत असतात. पत्रकारांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी उपक्रम राबविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त(Journalists Safety) केला.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात सहभागी होता आल्याचा मला आनंद आहे. पत्रकार प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हेल्मेटचे वाटप करण्याचा रोटरी क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा सामाजिक उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे (Journalists Safety)आहे.”
ज्ञानेश्वर विधाटे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की, समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही रोटरीची परंपरा आहे. समाजातील विविध घटकांसाठी रोटरीच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबविले जातात. पत्रकार बांधवांसाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न(Journalists Safety) राहील.
माजी अध्यक्ष संतोष मोरे म्हणाले की, रोटरी क्लबचे सदस्य स्वतःच्या सहभागातून आणि सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. समाजाच्या हितासाठी तसेच गरजू घटकांच्या मदतीसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यास रोटरी क्लब सदैव तत्पर(Journalists Safety) राहील.
पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे म्हणाले की, पत्रकार संघ आणि पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या हितासाठी काम करणारे घटक आहेत. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी दोन्ही संघटना एकत्रितपणे काम करतील. मुख्य आधारस्तंभ अरुण उर्फ नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पत्रकारांच्या हिताचे उपक्रम राबविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त (Journalists Safety)केला.
नगरसेवक विकास साने म्हणाले की, पत्रकार कायमच सत्याच्या बाजूने उभे राहतात. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या, अडचणी आणि अन्याय प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार हे विश्वासाचे माध्यम वाटते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या सामाजिक घटकाच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लबने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. पत्रकारांना हेल्मेटबरोबरच विमा संरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त(Journalists Safety) केली.
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाच्या महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे, माधुरी कोराड, लीना माने, श्रद्धा कोतावडेकर, श्रद्धा प्रभुणे, शेहनाज कुरणे, उपाध्यक्ष दादाराव आढाव, प्रवीण शिर्के, अशोक कोकणे, अविनाश कांबिकार, विवेक कुलकर्णी, भीमराव बरकडे, संतोष जाधव, प्रवीण कांबळे, श्रीधर जगताप, कालिंदर शेख, शफिक शेख, भीमराव तुरुकमारे, नागेश खजुर्गीकर, सीताराम मोरे, देवा भालके, दिलीप देहाडे, प्रदीप सपकाळ, राम बनसोडे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित (Journalists Safety)होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले, तर आभार प्रवीण शिर्के यांनी (Journalists Safety)मानले.
पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्याबरोबरच पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या या उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी स्वागत(Journalists Safety) केले.



