(पिंपरी, प्रतिनिधी ): श्री समर्थ युवा प्रतिष्ठान आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विश्वास पटवर्धन प्रस्तुत ‘स्वभाव राशींचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरणातील वाढोकर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार (Swabhav Rashiche)पडला .
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. निमंत्रक तथा माजी नगरसेवक अमित गावडे यांनी प्रास्ताविकात ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांचा, प्रेरणेचा आणि समाजातील योगदानाचा गौरव करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित (Swabhav Rashiche) केले.
यावेळी प्रमुख वक्ते विश्वास पटवर्धन यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रशेखर जोशी आणि अमित गावडे यांचाही परस्पर सत्कार करण्यात (Swabhav Rashiche)आला.
आपल्या खास शैलीतील सादरीकरणातून विश्वास पटवर्धन यांनी चारोळ्या, कविता आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या उदाहरणांचा आधार घेत बारा राशींचे गुणधर्म तसेच मानवी स्वभावाची विविध वैशिष्ट्ये उलगडून दाखवली. त्यांच्या खुमासदार आणि विनोदी शैलीमुळे उपस्थितांना हास्याची मेजवानी (Swabhav Rashiche) मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख ज्योती कानेटकर यांनी केले. उपाध्यक्ष दिलीप गोसावी यांनी आभार मानले. संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता (Swabhav Rashiche) झाली.
