(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील विविध सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. मालमत्ता करावर ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ केवळ ३० जून २०२६ पर्यंतच मिळणार असून, त्यानंतर कर भरणाऱ्या नागरिकांना या सवलती लागू होणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले (Property Tax Discount)आहे.
महापालिकेकडून नियमित करदाते तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांसाठी विविध प्रकारच्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन कर भरणारे नागरिक, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक तसेच सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सेंद्रिय कचरा प्रक्रिया यांसारखे ‘सिटिझन ग्रीन’ उपक्रम राबविणाऱ्या नागरिक व सोसायट्यांना ५ ते ५० टक्क्यांपर्यंत करसवलत दिली जात (Property Tax Discount)आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेची कर संकलन केंद्रे शनिवार व रविवारीही सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच ऑनलाईन व कॅशलेस माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांना विशेष सवलतींचा लाभ मिळत असल्याने, नागरिकांनी घरबसल्या डिजिटल पद्धतीने कर भरून ३० जूनपूर्वी उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले (Property Tax Discount)आहे.
