(पिंपरी प्रतिनिधी , दि. ५ जुलै ): कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहपूर्ण आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडले. चिंचवड येथील सुखी भवन सभागृहात झालेल्या या साहित्यिक सोहळ्यात लेकीचे अस्तित्व, कर्तृत्व, संघर्ष, माया आणि यश यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या कवितांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध (Karmayogini Mahila) केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. तुकाराम पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र घावटे, सौ. सविता इंगळे आणि सुरेश कंक उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. रोहिता गांधी यांनी ‘आहार व आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करत संतुलित जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित (Karmayogini Mahila)केले.
उद्घाटक प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि प्रभावी शैलीत, “लेक माऊली बापाची, लेक साऊली बापाची, लेक माहेराचा थाट, लेक संसाराचा पाट…” या ओळी सादर करत आई-वडील आणि लेकीतील अतूट नात्याचे हृदयस्पर्शी वर्णन केले. अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लेकीच्या कर्तृत्वाचा गौरव करत तिच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटे, सविता इंगळे आणि सुरेश कंक यांनीही लेकीचे गुणगान करणाऱ्या रचना सादर करून उपस्थितांची मने (Karmayogini Mahila) जिंकली.
या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेला राज्यभरातील तब्बल १०८ कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील कवितांचे परीक्षण ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा फाटक यांनी (Karmayogini Mahila) केले.
स्पर्धेत सरिता कलढोणे आणि प्रदीप बडदे यांना संयुक्त प्रथम क्रमांक, आर. पी. शिखरे आणि रजनी अहेरराव यांना संयुक्त द्वितीय क्रमांक, तर सुवर्णा बच्छाव आणि प्रतीक्षा ढोकळे यांना संयुक्त तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला. तसेच सुजाता भडभडे, सरोज गाजरे, सानिका पाटील, रसिका शाळिग्राम, योगिता कोठेकर आणि मंजुषा थावरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात (Karmayogini Mahila) आले.
यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सुमारे २५ कवींनी ‘लेक लाडकी’ या विषयावर भावस्पर्शी कविता सादर केल्या. दिनेश भोसले, हेमंत जोशी, शामराव सरकाळे, सुहास घुमरे, शोभा जोशी, वंदना इन्नानी, पितांबर लोहार, प्रदीप गांधलीकर, संतोष गाढवे, सुप्रिया लिमये, माधुरी डिसूजा, मीरा भागवत, कमल सोनजे, अरुण कांबळे, राधाबाई वाघमारे, जयश्री श्रीखंडे, नयन गोवंडे, संध्या शिंदे आणि डॉ. नीलिमा फाटक यांच्या काव्यसादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. लेकीच्या मायेचा, संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि कुटुंबातील तिच्या स्थानाचा विविध पैलूंनी वेध घेणाऱ्या कवितांनी उपस्थितांना भावूक (Karmayogini Mahila) केले.
या प्रसंगी मा. अभय पोखरणा, मीना पोखरणा, इंदूर येथील साहित्यिक संदीप राशिनकर व श्रिती राशिनकर, प्रा. पांडुरंग भोसले तसेच महेंद्र भारती यांची विशेष उपस्थिती (Karmayogini Mahila) लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सीमा शिरीष गांधी यांनी केले. त्यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले, तर संध्या शिंदे यांनी आभार (Karmayogini Mahila) मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण शिंदे, सिद्धार्थ गांधी, छाया शीलवंत आणि शांतीलाल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. या साहित्यिक सोहळ्यास राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद (Karmayogini Mahila) दिला.
