पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी, सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक, पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Ajit Pawar Contribution) होते.
माता रमाई स्मारकासाठी भीमसृष्टी मागील आरक्षित २३ गुंठे जागा मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांकडून आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा सुरू होता. अनेक अडथळ्यांनंतर अखेर ही जागा स्मारकासाठी उपलब्ध (Ajit Pawar Contribution) झाली.
या प्रक्रियेत दिवंगत अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत संबंधित यंत्रणांना जागा तातडीने वर्ग करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळेच हे ऐतिहासिक काम मार्गी लागल्याची भावना व्यक्त करण्यात (Ajit Pawar Contribution)आली.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, माता रमाई यांच्या त्याग, संघर्ष आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील योगदानाच्या स्मरणार्थ उभारले जाणारे हे स्मारक प्रेरणादायी ठरेल. स्मारकाचे काम दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात(Ajit Pawar Contribution) आले.

