प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भाडे व अनामत रक्कम वसुलीत तब्बल ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. या प्रकरणात क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत (Ramkrishna More Auditorium)दिली.
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत भाडे वसुली व अनामत रकमेच्या नोंदीत गंभीर अनियमितता आढळल्याचे अहवालात नमूद आहे. पावत्यांची विल्हेवाट, रकमेची अपूर्ण नोंद आणि काही व्यवहार कोषागारात जमा न झाल्याचेही स्पष्ट झाले (Ramkrishna More Auditorium) आहे.
या प्रकरणी एका लिपिकाला निलंबित करण्यात आले असून संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विभागीय चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले (Ramkrishna More Auditorium) आहे.


