(चिंचवड,प्रतिनिधी ता. ३१ ): चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित भव्य नृत्य स्पर्धेत ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी आपल्या आकर्षक आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक (Nari Shakti Mahotsav)पटकावला.
आमदार उमा खापरे यांच्या पुढाकारातून आणि पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ जुलैदरम्यान “नारीशक्ती महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, नृत्य स्पर्धेत सुमारे ३० ते ३५ ग्रुप सहभागी झाले (Nari Shakti Mahotsav) होते.
या स्पर्धेत ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारे आगळेवेगळे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणात वारकरी परंपरेतील भक्तिभाव व्यक्त करणारी ‘दिंडी’, श्रावणातील उत्साह आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेली ‘मंगळागौर’ तसेच खानदेशातील जोशपूर्ण ‘खानदेशी नृत्य’ यांचा सुरेख मिलाफ सादर करण्यात (Nari Shakti Mahotsav)आला.
भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा संगम घडविणाऱ्या या ‘दिंडी, मंगळागौर आणि खानदेशी फ्युजन’ सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या महिलांच्या कलागुणांचे आमदार उमा खापरे तसेच उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक(Nari Shakti Mahotsav) केले.
या यशस्वी ग्रुपमध्ये अध्यक्षा मनीषा जगताप, उपाध्यक्षा रोहिणी लांडगे यांच्यासह दया भोमे, वैशाली पाटील, रुपाली महाजन, हर्षा सरोदे, उज्ज्वला शिंगटे, मीना पाटील, दीपा कुपटे, स्मिता घनमोडे, प्रिया बाविस्कर, रेखा गोलासे आणि कांचन यांनी सहभाग (Nari Shakti Mahotsav)घेतला.
या सादरीकरणासाठी अंजली इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर स्पर्धकांचा आकर्षक मेकअप सारिका सुतार यांनी केला. संपूर्ण टीमच्या एकजुटी, मेहनत आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत (Nari Shakti Mahotsav)आहे.
