(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे ७ जुलै रोजी देहूगावातून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने ५ ते ९ जुलैदरम्यान देहूगाव, निगडी, आकुर्डी आणि पालखी मार्गावरील वाहतुकीत व्यापक बदल जाहीर केले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले (Tukaram Maharaj Palkhi) आहे.
पालखीचे वेळापत्रक
– ७ जुलै : देहूगावातून पालखीचे प्रस्थान; रात्री मुक्काम इनामदार वाडा (देहूगाव).
– ८ जुलै : देहूगावातून आकुर्डीकडे प्रस्थान; रात्री मुक्काम श्री विठ्ठल मंदिर (आकुर्डी).
– ९ जुलै : आकुर्डीतून दापोडी हॅरिस ब्रिजमार्गे पुण्याकडे(Tukaram Maharaj Palkhi) प्रस्थान.
जड वाहनांवर निर्बंध
५ जुलै दुपारी १२ ते ८ जुलै रात्री ९ वाजेपर्यंत देहू कमान ते भक्ती-शक्ती चौक या जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर अत्यावश्यक सेवा व एसटी बस वगळता जड वाहनांना प्रवेशबंदी (Tukaram Maharaj Palkhi)असेल.
तळेगाव–चाकण रोड ते देहू फाटा तसेच आयटी पार्क–कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक या मार्गांवरही जड वाहनांना बंदी राहील. या वाहनांसाठी त्रिवेणीनगर, तळवडे, महिंद्रा सर्कल, एच.पी. चौक, कॅनबे चौक आणि गावठाण मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले (Tukaram Maharaj Palkhi)आहेत.
देहूगावात सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी
५ ते ८ जुलैदरम्यान देहूगावातील अंतर्गत रस्त्यांवर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. खंडेलवाल चौक, तुकाराम वजन काटा, कंद पाटील चौक, परंडवाल चौक, हॉटेल कॉर्नर चौक, साईराज चौक, भैरवनाथ चौक, गायरान क्रीडा संकुल, युनिकेटर हॉस्पिटल आणि मुख्य कमान येथून वाहनांना प्रवेश दिला जाणार (Tukaram Maharaj Palkhi)नाही.
तसेच चौदा टाळकरी कमान, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य प्रवेशद्वार आणि इनामदार वाडा परिसरात वाहनांना प्रवेश व पार्किंगस बंदी (Tukaram Maharaj Palkhi)असेल.

८ जुलै रोजी देहू कमान ते परंडवाल चौक या मुख्य पालखी मार्गावर सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद (Tukaram Maharaj Palkhi)राहील.
८ आणि ९ जुलैला महामार्गावरील वाहतुकीत बदल
पालखी पुढे सरकत असताना जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार(Tukaram Maharaj Palkhi) आहे.
देहूरोड सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती चौक, भक्ती-शक्ती चौक ते पुणे दिशेचा मार्ग, त्रिवेणीनगर, थरमॅक्स चौक तसेच नाशिक फाटा ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू राहतील. या वाहनांसाठी मामुर्डी, किवळे, भुमकर चौक, डांगे चौक, काचघर चौक, बिजलीनगर चौक, अंकुश चौक, भेळ चौक, चिंचवड, कोकणे चौक आणि जगताप डेअरी चौकमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली (Tukaram Maharaj Palkhi)आहे.
भाविकांसाठी वाहनतळ
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी अधिकृत वाहनतळांचाच वापर करावा. गायरान मैदान (तळवडे), सीओडी मैदान, माऊली वजन काट्याशेजारील मैदान, सप्तपदी मंगल कार्यालय मैदान आणि भगीरथी लॉन्स परिसरात वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली (Tukaram Maharaj Palkhi)आहे.
नो-पार्किंग झोन
८ आणि ९ जुलै रोजी आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिर ते खंडोबा माळ चौक आणि तेथून हॅरिस ब्रिज (दापोडी) या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना तात्पुरता नो-पार्किंग झोन लागू राहणार(Tukaram Maharaj Palkhi) आहे.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने आणि पालखी सोहळ्यातील अधिकृत दिंड्यांच्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि वाहतूक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले(Tukaram Maharaj Palkhi) आहे.


