पुणे | प्रतिनिधी:पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणात मृतांचा आकडा वाढतच असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठी आणि कठोर कारवाई करत हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले (Pune liquor Case)आहे.
या निर्णयामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून अवैध दारू विक्रीविरोधातील कारवाई आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी उशिरा रात्री निलंबनाचे आदेश जारी (Pune liquor Case)केले.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे. विषारी दारू प्रकरणात कर्तव्यात झालेल्या कथित हलगर्जीपणा आणि अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आलेल्या अपयशाची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात (Pune liquor Case)आहे.
नव्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती
या कारवाईनंतर हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अशोक इप्पर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने पदभार स्वीकारला असून पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कारभारासह सुरू असलेल्या तपासाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली (Pune liquor Case)आहे.
चार मृत्यूंनी उघडकीस आले गंभीर वास्तव
हडपसर परिसरात विषारी दारू सेवनामुळे सुरुवातीला चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची तीव्रता समोर आली. त्यानंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला असता विषारी दारूच्या सेवनामुळे इतर भागांतील मृत्यूंचाही संबंध या प्रकरणाशी जोडला गेला. परिणामी मृतांचा आकडा १५ वर पोहोचला असून आणखी काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याने प्रशासनाची चिंता वाढली (Pune liquor Case)आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट
घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. काहींनी पोलिसांवर अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचे गंभीर आरोपही केले. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला (Pune liquor Case) होता.
तपासाची व्याप्ती वाढली
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि इतर तपास यंत्रणा संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विषारी दारूची निर्मिती, पुरवठा साखळी, वितरण यंत्रणा तसेच यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून विविध ठिकाणी छापेमारीही करण्यात येत (Pune liquor Case)आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने अवैध मद्यविक्रीच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत (Pune liquor Case) आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या विषारी दारूकांडाच्या तपासाकडे लागले (Pune liquor Case)आहे.

