पिंपरी चिंचवड, दि. १८ एप्रिल २०२६(प्रतिनिधी )— मोहननगर येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलावासह शहरातील सर्व जलतरण तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून न चालवता पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर आणि अंकिता लंगोटे यांना निवेदन दिले (Maruti Bhapkar) आहे.
भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मोहननगरसह विविध भागांतील सुमारे १० जलतरण तलाव २०१६-१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खोली कमी करण्याच्या कामासाठी बंद करण्यात आले होते. मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव तब्बल आठ ते नऊ वर्षे बंद राहिल्याने नागरिक, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकला(Maruti Bhapkar)नाही.
तसेच, तलाव पुन्हा सुरू व्हावेत यासाठी आपण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये तलाव दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी सुमारे ३ कोटी ९१ लाख रुपयांची निविदा काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद(Maruti Bhapkar)केले.
भापकर यांनी आरोप केला की, पूर्वी हे जलतरण तलाव महापालिकेमार्फत परवडणाऱ्या दरात चालवले जात होते. मात्र आता ठेकेदारी पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय रद्द करून तलाव पुन्हा महापालिकेच्या ताब्यात चालवावेत, अशी भूमिका(Maruti Bhapkar)घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, आपल्या नगरसेवक कार्यकाळात मोहननगर येथील राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बीओटी तत्त्वावर उभारण्याचा निर्णय रद्द करून तो प्रकल्प महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आला होता. त्याच धर्तीवर जलतरण तलावाबाबतही जनहिताचा निर्णय (Maruti Bhapkar)घ्यावा.
आज जलतरण तलावाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी, आमदार आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असताना, परिसरातील चारही नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांकडे ठेकेदारीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करावी, अशी विनंतीही भापकर यांनी केली(Maruti Bhapkar)आहे.
