पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Bhiku Waghere Patil) होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितवादी कार्याचा वारसा आजही प्रेरणादायी असल्याचे (Bhiku Waghere Patil) सांगितले.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अॅड. एस. बी. चांडक यांना प्रतिष्ठेचा ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात (Bhiku Waghere Patil) आले.
या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शैलजा बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष चेतन (अण्णा) पवार, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित (Bhiku Waghere Patil) होते.
स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात ९७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन (Bhiku Waghere Patil)घडविले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाघेरे कुटुंबीय, स्मृतिदिन समिती तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा व समाजसेवेच्या वारशाचा जागर पुढेही कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त(Bhiku Waghere Patil) केला.
