( विवेक कुलकर्णी)आजच्या काळात अनेकांच्या मनात एक समज रूढ झालेला दिसतो — वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अफाट पैसा कमविण्याचे साधन. मोठमोठी सुसज्ज रुग्णालये, आधुनिक यंत्रसामग्री आणि त्याकडे आशेने पाहणारा सामान्य, अनेकदा असहाय्य रुग्ण… त्यामुळे कधी कधी डॉक्टरांविषयी गैरसमज निर्माण होतात.परंतु या समजाला खोटे ठरवणारे, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे अनेक धन्वंतरी आजही समाजात आहेत. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजसेवेसाठी करणारे हे डॉक्टरच खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान वाढवत असतात. अशाच सेवाभावी आणि कर्तृत्ववान डॉक्टरांपैकी एक नाव म्हणजे निगडी येथील जेष्ठ व अनुभवी सर्जन डॉ. सुवर्णा अभय (Women’s Day) दिवाण.
संतभूमीतून वैद्यकीय सेवेकडे
डॉ. सुवर्णा दिवाण या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या संतश्रेष्ठ दामाजी पंत यांच्या पावन स्मृतीने पवित्र झालेल्या भूमीतील. वडील अॅड. अप्पासाहेब नागणे यांच्या त्या कनिष्ठ कन्या. लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या सुवर्णाताईंनी शिक्षणात नेहमीच उल्लेखनीय यश संपादन केले.दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवत वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल सुरू केली. पुढे सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एम.एस. इन सर्जरी पूर्ण करत शल्यचिकित्सक म्हणून आपली ओळख निर्माण (Women’s Day)केली.
याच काळात त्यांची ओळख झाली परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावातील तल्लख आणि अभ्यासू तरुण डॉ. अभय दिवाण यांच्याशी. समान विचार, वैद्यकीय क्षेत्रातील समर्पण आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द — या समान धाग्यांनी दोघांची मैत्री जुळली आणि पुढे ती आयुष्यभराच्या नात्यात रूपांतरित (Women’s Day) झाली.
संघर्षातून उभे राहिलेले दिवाण हॉस्पिटल
लग्नानंतर या जोडीने पिंपरी-चिंचवड परिसरातल्या निगडी येथे अत्यंत लहान जागेत आपली वैद्यकीय सेवा सुरू केली. सुरुवातीचे दिवस आव्हानात्मक होते. साधनसामग्री कमी, जागा लहान आणि रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे मोठे (Women’s Day) आव्हान…
परंतु कुशल वैद्यकीय ज्ञान, रुग्णांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रामाणिक सेवा या बळावर त्यांनी हळूहळू लोकांचा विश्वास संपादन केला. काळाच्या ओघात ही छोटी क्लिनिक वाढत वाढत अत्याधुनिक सुविधा असलेल्या दिवाण हॉस्पिटलमध्ये रूपांतरित (Women’s Day) झाली.
या दाम्पत्याने रुग्णांना केवळ उपचार दिले नाहीत, तर त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मानसिक आधारही दिला. त्यामुळे परिसरात एक विश्वास निर्माण (Women’s Day) झाला —
“हाडांच्या किंवा शस्त्रक्रियेच्या कोणत्याही आजारासाठी खात्रीशीर उपचार म्हणजे दिवाण हॉस्पिटल.”
आयुष्यातील कठीण वळण
सगळे काही सुरळीत सुरू असतानाच नियतीने अचानक वेगळे वळण घेतले. कोरोनाच्या काही काळानंतर डॉ. अभय दिवाण यांचे अकाली निधन झाले.
“लाख गेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जाऊ नये” ही म्हण त्या प्रसंगी अनेकांना(Women’s Day) आठवली.
त्यांच्या अंतिम निरोपासाठी वैकुंठभूमीत समाजातील असंख्य लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावरूनच त्यांच्या सेवाभावाची आणि लोकप्रियतेची साक्ष (Women’s Day) मिळते.
हा धक्का कोणालाही खचवणारा होता. काही काळ डॉ. सुवर्णा दिवाण खचल्या देखील. पण त्यांनी आपल्या वैयक्तिक दुःखावर मात करत पुन्हा एकदा स्वतःला रुग्णसेवेसाठी समर्पित(Women’s Day) केले.

आजही कायम तोच विश्वास
आजही दिवाण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एकच विश्वास असतो —
इथे उपचारासोबत माणुसकीही मिळते.
डॉ. सुवर्णा दिवाण यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण पूर्णपणे बरा होणे. फी किंवा आर्थिक व्यवहार हा त्यांच्या दृष्टीने दुय्यम विषय(Women’s Day) असतो.
हर्निया, हाडांच्या शस्त्रक्रिया, तसेच काही दुर्मिळ शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी अनेक रुग्णांना नवे जीवन दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव, आत्मविश्वास आणि सेवाभाव यामुळे त्या आजही परिसरातील लोकांसाठी विश्वासाचे प्रतीक बनल्या(Women’s Day) आहेत.
डॉ. सुवर्णा दिवाण यांचे आयुष्य हे केवळ डॉक्टर म्हणून यशस्वी होण्याचे उदाहरण नाही, तर सेवा, संघर्ष आणि जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण(Women’s Day) आहे.
स्वतःच्या दुःखावर मात करून समाजासाठी कार्य करत राहणे, रुग्णांना आपलेसे मानून त्यांची सेवा करणे आणि वैद्यकीय व्यवसायाला खऱ्या अर्थाने सेवा व्रत मानणे — ही त्यांची खरी ओळख (Women’s Day) आहे.
मानाचा मुजरा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या या कर्तृत्ववान महिला डॉक्टरांना माझंपिंपरीचिंचवड.in पोर्टलच्या वतीने मनःपूर्वक अभिवादन आणि मानाचा(Women’s Day) मुजरा.
त्यांचे कार्य अनेक तरुण डॉक्टरांसाठी प्रेरणादायी ठरो आणि रुग्णसेवेची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो — हीच (Women’s Day) सदिच्छा.
