(पिंपरी, प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (२१ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरणात ८२.४२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली (Pawana Dam Water)आहे.
धरण प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या धरणाची जलपातळी ६११.३१ मीटर (२००४.९९ फूट) इतकी आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २२९.८२ दशलक्ष घनमीटर (७९९३.१३ दशलक्ष घनफूट) असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १९८.६८ दशलक्ष घनमीटर (६८९२.४३ दशलक्ष घनफूट) इतका नोंदविण्यात आला (Pawana Dam Water)आहे.
धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत ४६ मिलिमीटर, तर यंदाच्या पावसाळी हंगामात एकूण १,६६९ मिलिमीटर पाऊस झाला(Pawana Dam Water) आहे.
दरम्यान, धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी सध्या जलविद्युत केंद्रातून कोणताही विसर्ग सुरू नाही. तसेच सांडव्यातूनही पाणी सोडण्यात आलेले नसल्याने धरणातून एकूण विसर्ग शून्य क्युसेक असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली (Pawana Dam Water)आहे.
